मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

मुलांना नॉन व्हेज खाऊ घाला पण....

लहान मुलांना काहीही नवीन वस्तू खायला देताना मनात थोडी भीती असते. कित्येक पालक हा विचार करतात की लहान वयात मुलांना नॉन व्हेज खायला देणे योग्य आहे वा नाही. तसे नॉन व्हेज मध्ये भरपूर मात्रेत प्रोटीन असतं पण जन्माच्या पहिल्या वर्षी मुलांचं पचन तंत्र हे पचविण्यासाठी सक्षम नसतं. म्हणून मुलांना नॉन व्हेज सुरू करवण्याआधी जाणून घ्या काही नियम:

अंड्याने करा सुरुवात
अंडे प्रोटीनयुक्त असतात. तरीही मूल 9 महिन्याचं झाल्याशिवाय अंडं देऊ नये. यासाठी पचन तंत्र परिपक्व असणे आवश्यक आहे.


 
 

फिश आणि चिकन
मूल एक वर्षाचा झाल्यानंतर फिश आणि चिकन देयला सुरू करा. आधी एक- दोन महिने शोरबा किंवा सूप द्यावं. यानंतर बॉइल्ड आणि ग्रिल्ड चिकन देयला सुरू करावे. चिकनच्या तुकड्यांपासून सुरुवात करू नये.

5 वर्षापर्यंत रेड मीट नको
रेडमीटमध्ये नाइट्रेटची मात्रा ‍अधिक असल्याने मुलांचा मानसिक विकास प्रभावित होऊ शकतो. मूल पाच वर्षाचा होईपर्यंत रेडमीट खायला देऊ नये.

अधिक सेवन नको
मुलांना नॉन व्हेज आठवड्यातून दोनदाच द्या.