शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

तेव्हा पाळीत वाळू आणि लाकूड वापरायच्या स्त्रिया

मासिक पाळी हा स्त्रियांसाठी वेदनादायक काळ असला तरी हल्ली बाजारात मिळत असलेल्या सेनेटरी नॅपकिनमुळे त्या दिवसांमधला त्रास कमी झाला असे म्हणू शकतो. परंतू जेव्हा हे पेड नसायचे तेव्हाच्या स्त्रिया या दिवसात काय वापरायच्या हा ही प्रश्न अनेक लोकांच्या मनात येतच असेल. आपल्या जाणून खरचं आश्चर्य वाटेल की त्या काळी स्त्रिया लाकूड, वाळू, शेवाळ आणि गवत अश्या वस्तू वापरायच्या.

बेन फ्रॅकलिनने सर्वात आधी डिस्पोझेबल सेनेटरी पॅड्सचा आविष्कार केला परंतू त्याचा वापर पीरियड्ससाठी नव्हे तर युद्धात जखमी झालेल्या लोकांच्या शरीरातून वाहत असलेल्या रक्ताला थांबवण्यासाठी केला जायचा. नंतर व्यावसायिक रूपाने स्त्रियांसाठी 1888 पासून डिस्पोझेबल पॅड्स बाजारात मिळू लागले. पण त्यापूर्वी स्त्रिया काय वापरत होत्या ते जाणून आपल्याला आश्चर्य वाटेल.
 
शेवाळ
स्त्रिया शेवाळ गोळा करून ते एका कापडात गुंडाळून पॅड म्हणून वापरायच्या. हा उपाय चांगला वाटत असला तरी शेवाळामध्ये परजीवी असायचे जे निश्चितच आरोग्यासाठी धोकादायक होते.
 
लिपि पत्र
मिश्र येथे रक्तस्त्राव थांबवण्यासाठी स्त्रिया एका प्रकाराचं पत्र वापरायच्या. हे लिपी पत्र पाण्यात भिजवून पॅड्सप्रमाणे वापरलं जायचं.

वाळू
चायनीज स्त्रिया ब्लीडिंगपासून बचावासाठी एका कापडात वाळू भरून गाठ मारायच्या. वाळू ओली झाल्यावर त्यातून वाळू काढून तो कापड धुऊन वाळवून पुन्हा वापरायच्या.
 
गवत
आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया येथील स्त्रिया गवत गोळा करून ती पॅडप्रमाणे वापरायला घ्यायच्या.
बँडेज
प्रथम विश्व युद्धात सर्वप्रथम बँडेज वापरण्यात आल्या होत्या. फ्रान्समध्ये जखमी सैनिकांसाठी बँडेज वापरल्या जात होतंय. नंतर येथील नर्सने विचार केला की हे पिरियडास दरम्यान होणार्‍या ब्लीडिंगपासून मुक्तीसाठी वापरलं जाऊ शकतं.
 
जुने कपडे
आजही गावांमध्ये किंवा लहान शहरांमध्ये अनेक स्त्रिया सेनेटरी पॅडऐवजी जुने कपडे वापरतात. परंतू आरोग्यदृष्ट्या हे योग्य नाही.

देवदार झाडाचे साल
नेटिव्ह अमेरिका येथील स्त्रियांसाठी हाच पर्याय होता. हे पातळ आणि हलकं असल्यामुळे ओलसरपणा शोषून घेत होतं.
 
लोकर
रोम येथील स्त्रिया मास्की पाळीत लोकर वापरायच्या.
 
लाकूड
गुप्तांगजवळ लाकूड लावायचं हा विचार करूनच आंगाला शहारे येतात. परंतू ग्रीस येथील स्त्रिया लिंटचे लाकूड आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये अशा प्रकारे लावायचा ज्यानेकरून ब्लीडिंग थांबायचं. परंतू हा उपाय खूपच धोकादायक असायचा.
 
जनावरांची कातडी
थंड प्रदेशांमध्ये स्त्रिया जनावरांची कातडी पॅडप्रमाणे वापरायच्या.