Last Modified: मुंबई , मंगळवार, 29 डिसेंबर 2009 (11:38 IST)
चार दिवसांनंतर बाजार उघडला
सलग चार दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा शेअर बाजार सुरू झाले आहेत. गुरुवारी बंद झालेल्या आकडेवारीच्या मानाने बीएसईचा निर्देशांक 53 अंशांनी वधारत 17413 अंशांवर तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 14 अंशांनी वधारत 5192 अंशांवर आहे.
शुक्रवारी ख्रिसमस असल्याने बाजार बंद होता. नंतरचे दोन दिवस बाजाराला साप्ताहिक सुट्टी होती, तर सोमवारी मोहरम निमित्त बाजार बंद होता.
आज बाजार सुरू झाल्यानंतर बाजारात चांगली वाढ दिसून येत आहे. सोमवारी अमेरिकी बाजारात चांगली वाढ झाल्याने भारतीय बाजारातही आज सकारात्मक वातावरण दिसून येत आहे.