टपाल विभागाची सोने खरेदीवर सूट
टपाल विभागाने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या खरेदीवर आकर्षक सूट जाहीर केली असून सरकारी कर्मचा-यांना पोस्ट कार्यालयातून सोन्याची नाणे खरेदी करण्यावर सहा टक्क्यांची सूट मिळणार आहे. तर असरकारी कर्मचा-यांना दहा ग्रॅम सोन्याच्या खरेदीवर अर्धा ग्रॅम सोने मोफत दिले जाणार आहे.
कानपूर जीपीओचे चीफ पोस्टमास्टर के.के. यादव यांनी ही माहिती दिली. टपाल विभागाकडून विक्री केले जाणारे नाणे 24 कॅरेट असतील असे सांगून त्यांची शुध्दता 99.99 टक्के राहिल असेही त्यांनी सांगितले. ही योजना 24 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.