- वृत्त-जगत
» - अर्थजगत
» - शेअर बाजार
भारतीय एनडीआरला नफा
अमेरिकी शेअर बाजारात असलेल्या भारतीय शेअर्सना मागील आठवड्यात तीन अब्ज डॉलरचा नफा झाला आहे. यात इंफोसिस कंपनी आघाडीवर आहे. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज आणि नॅस्डॅक मधील भारतीय कंपन्यांचे मूल्य 28 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात 2.63 अब्ज डॉलरने वाढले, यात एकट्या इंफोसिसचे 1.13 अब्ज डॉलरचे योगदान होते. आयटी क्षेत्रातील आणखी एक कंपनी विप्रोच्या शेअर्समध्ये 67.3 कोटी डॉलरची वाढ नोंदवली गेली. तर तांबा उत्पादक स्टरलाइट इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 55.3 कोटी डॉलरची वाढ दिसून आली.