1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

शेअर बाजारात 340 अंशांची वाढ

शेअर बाजारासाठी आज आठवड्याची दणक्यात सुरुवात झाली. बीएसई 340.44 अंशांनी अर्थात 2.11 टक्क्यांनी वधारत 16498.72 अंशांवर तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 102.25 अंशांनी वधारत 4898.40 अंशांवर बंद झाला.

सरकारने आर्थिक सुधारणांना वाव देण्याची घोषणा केल्याचा चांगला फायदा बाजाराला मिळाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

आर्थिक सुधारणांना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, विकास दर आगामी काळात सात टक्क्यांवर जाण्याची आशा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली होती.

याचा चांगलाच फायदा आज बाजारात दिसून आला. रिलायन्सच्या शेअर्समध्ये 3.46 टक्क्यांची वाढ झाली. तर स्टेट बँकेच्या शेअर्समध्ये 5.19 टक्क्यांची तेजी दिसून आली. बँकिंग क्षेत्रातील सर्वच प्रमुख शेअर्समध्ये आज तेजी दिसत होती.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा