1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

शेअर बाजारात 387 अंशांची घसरण

अमेरिका पाठोपाठ अनेक बाजारांमध्ये घसरण झाल्यानंतर आज मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक 387 अंशांनी तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 124 अंशांनी कोसळला.

सोमवार प्रमाणेच आजही बाजारात पहिल्या सत्रात तेजी दिसून येत होती, मात्र बाजार दुपारच्या आणि अंतिम सत्रात मोठी घसरण दिसून आली.

आज बीएसईमध्ये 387 अंशांची घसरण झाल्याने बाजार 16353 अंशांवर तर निफ्टीत 124 अंशांनी घसरत 4847 अंशांवर बंद झाला.

विप्रो, टाटा मोटर्स, हिंद यूनीलिव्हर, ग्रासिम इंडस्ट्रीज, सनफार्मिंडस, या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली तर हिंडाल्को, यूनीटेक, रिलायन्स कॅपिटल, टाटा स्टील, भारती एअरटेल, या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर पडझड झाली.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा