Festival Posters
✕

अरे संसार संसार......

Updated: गुरूवार, 21 मे 2020 (10:06 IST)
 
तुला स्वयंपाक येतो का ? विचारले असता
 
हो येतो ना थोडा थोडा.. 
 
सकाळी कं. लंच घेतो संध्याकाळी काय कधी वरण भात, कधी पोळी भाजी, कधी खिचडी असे मी 3 दिवस कधी सुशील 3 दिवस असे करतो. संडेला बाहेरचे काही मागवतो किंवा मॅगी वगैरे.
 
एकंदर फार छान चाललंय आमचं....
 
मला गंमत वाटली ऐकून. पण असं कसं ग ?
 
कितीतरी गोष्टी असतात घर म्हंटल की....
 
दूध दूभतं, कपडे, भांडी, बाया, प्रेसवाला, भाजी किराणा, घरातली आवर सावर, जाळे जळमटे, बाईकडून किंवा स्वतः सुटीच्या दिवशी करायची कामे....गॅस  सिलेन्डर....अनेक प्रकारची बीलं.... मी आपली अनुदिनी अनूतापे तापलो रामराया म्हणत संसाररूपी गाडा हाकत असताना हे लोक एवढ्या सहज सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करतात ?
 
त्यावर तिचे उत्तर ठरलेले सगळी कामे आम्ही 50/50 करतो. जास्त घोळ घालत नाही. माझ्या मनातले काही प्रश्न मात्र अनुत्तरितच.....ह्यांना कधी गरम उपमा पोहे शिरा खावासाच वाटत नसेल का ? कपड्यांच्या पसारा कोण आवरत असेल...वगैरे अरसिक, अनरोमँटिक विचार यायचे थांबत नव्हते.
 
अशीच एकदा सुशीलशी गाठ पडली. उदास दिसला. विचारल्यावर हळूच म्हणाला मावशी आईची हल्ली फार आठवण येते. गुगल वर सगळ्या रेसिपीज मिळतात...विकतही पदार्थ मिळतात पण मला कंटाळा आलाय....
 
थालीपीठ, उकडपेंडी, शेवयाची खीर, शेवग्याच्या शेंगांची भाजी, चिंच गुळाचं वरण ह्या तेव्हाच्या नावडत्या गोष्टींची आता तीव्रतेने आठवण येते. दोघांचीही परिस्थिती साधारण सारखीच झाली होती....
 
हत्तीच्या एवढेच काय ? मी खाऊ घालेन की... मला श्रावणात आयतेच मेहुण घडेल. 
दोघांनाही पुरणावरणाचे जेवू घातल्यावर त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. मलाही समाधान होते. जाताना डबडबलेल्या डोळ्यांनी सानिका म्हणाली मलाही असे कधी करायला जमेल का हो मावशी....
 
तिला सांगितले अगं तुला असं वाटणं हेच तू संसारी होत असल्याचं द्योतक आहे.. आताचे फुलपाखराचे दिवस आहेत तुझे...हळूहळू आपोआप संसारी होत जाशील...मग आहेच 'खुर्ची का मिर्ची.....जाशील कैशी...

विनीत - स्नेहल खंडागळे 
About Author
स्नेहल प्रकाश
Sr. Executive - Administration & Accounts.... Read More

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

हिवाळ्यात मोजे घालून झोपणे योग्य आहे की अयोग्य? जाणून घ्या....

बागकाम टिप्स: कोरफडीचे कोमेजलेले रोप पुन्हा हिरवेगार ठेवण्यासाठी वापरा या सोप्या पद्धती

चाळिशीनंतरही तुम्हाला दिसायचे पंचवीस वर्षांचे तर ही सोपी योगासने मदत करतील

हिवाळ्यातही चमकदार चेहरा हवा आहे का? आंघोळीपूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

प्रेरणादायी कथा : विवेकबुद्धी आणि संयम.....गोष्ट हिऱ्याची खाण

पुढील लेख
Show comments