हळदी कुंकु - कल, आज और कल
- नियती सप्रे
हळदी कुंकु म्हणा किंवा कुठला ही दुसरा सण म्हणा आपल्या भारतात कधीही बंद होणार नाही कारण आपण सर्व भारतीय 'उत्सव प्रिय' आहोत. हो, पण त्या त्या सणाला साजरा करण्याची पद्धत जरूर बदलू शकते. बदलत ही आहे. आज आपण हळदी कुंकाबद्दल बोलया.पूर्वी हळदी कुंकु फारच थाटात साजरा केला जात होता. बायका शालू, जरीच्या साड्या इत्यादी नेसून भरदस्त दागिने घालून मिरवत होत्या. गौरी समोर देखील चांदी, सोन्याचे पात्र ठेवले जात होते. त्या एकमेकींबरोबर हळदी कुंकाला जात होत्या. त्यांच्या आपसात बोलण्याचा एक दृश्य मी तुमचा समोर ठेवते. नावं आणि इतरही सगळं काल्पनिक आहे. कोणाशी देखील त्याचा काहीही संबंध नाही, हं तर ऐका- '
काहो, विमल ताई, चला लवकर तो तांगेवाला कधीची वाट बघत आहे. ''ही बघा आलेच, आहो ही वाकीच होत नव्हती मला.'' ''
तुमचं वजन वाढलय, भाऊ साहेब खूप लक्ष ठेवतात तुमचं.'' ''
काही तरीच काय मंडळी असते तरी कां घरी, लक्ष ठेवायला'', विमल ताई लाजून म्हणाल्या. आता आजकाल 'मंडळी' गायब झाली आहेत चारीकडे मंडळ निर्माण झाली आहेत. ते जाऊ द्या!! हे झालं पूर्वीच, आता आजच, आजपण बायकां एकमेकांबरोबरच जातात. त्यांच्यात पण गप्पा होतात फक्त विषय बदलला आहे. तो असा - ''
ऐ निलू निघ लवकर, माझा ड्रायव्हर कधीची वाट बघत आहे.'' ''
अग येत आहे मी हळू हळू!! तू तर गुडघ्याला चायनाची पट्टी लावली आहे म्हणून पटापटा चालते.'' ''
निलू तुला कितीदा सांगितलं आहे की याला पट्टी म्हणत नाही. त्याला 'नीकेप' म्हणतात. त्याचेही बरेच प्रकार असतात, एक असतो त्याच्या दोन्ही बाजूला रॉड आहे ते गुडघ्याला सपोर्ट देतात.'' ''
काग, ताच्यातच तू चांदीचे रॉड टाकले आहे ना!'' हो, ग, ताट मोडून केले आहे, करायचं तरी काय ते चांदीचे ताट ठेवून. ही बघ मी फोल्डिंग चेअरपण आणली आहे. बरोबर न्यायला. आणि या डबीत काय आहे.? अग डायबिटीजची गोळी ठेवली आहे. नाथ मंदिर भगिनी मंडळमध्ये भरपूर नाश्ता देतात, त्यात करंजी पण असते. ''
तुझा विचार चांगला आहे, पण गोळी खायची घाई करू नको, नाहीतर शकु सारखा गोंधळ होईल.'' ''
शकुचा काय गोंधळ झाला होता गा?'' ''
अग ती एका ठिकाणी हळदी कुंकाला गेली होती. दुरून तिने प्लेट भरलेल्या बघितल्या आणि टाकली गोळी तोंडात पण त्या प्लेटमध्ये दोन काकडीचे काप होते. त्या बाई म्हणाल्या आजकाल कोणालाही डाळ करंजी सोसत नाही म्हणून मी पौष्टिक नाश्ता ठेवला आहे.'' ''
कधीची गोष्ट सांगत आहे? तेव्हा पुण्याची डायरेक्ट ट्रेन न? माझी साडी बघू नको. आता भारी साड्या शरीराला पेलवत नाही. पूर्वी सारखचं जम्मत गम्मत करत आजकालपण बायका तशाच हळदी कुंकुला जातात.''
आता येणार्या 'कल'चे काही दृश्य सगळ्या कामाकरिता बायका लावणं सुरू आहे, त्याची पराकाष्ठा! ''हॅलो सुमा, आज हळदी कुंकु 12 ते चारपर्यंत ठेवलं आहे. वेळेच बंधन पाळायला सांग आपल्या बाईला. कारण माझी बाई चारच्या पुढे एक मिनिट देखील थांबणार नाही.'' ''
तू घाबरु नको, मी आपल्या बाईला हळदी कुंकु घ्यायला वेळेवर पाठवेण फक्त ती महामाया हजर झाली पाहिजे. फारच नागे करते. हो, पण हे दृश्य तेव्हांच शक्य आहे की 'बाई' हा प्रकार तोपर्यंत टिकला तर. कारण ह्या कामवाल्याचे बौद्धिकस्तर फारच वाढती वर आहे. मी आपल्या बाईची गोष्ट सांगते. अगदी कालचं घडलेली. मी तिला रागवले की तू बिन सांगता नाका का केला, तर ती म्हणाली - वा मॅडम, पिछले महीने आपने मेरे आठ दिन की छुट्टीके पैसे काटलिये थे तो मैं बॅलेंस नही डाल पाई, पर आप फेसबुक पर नहीं जाती क्या? मैंने उसपर तो लिख दिया था की मेरा पती छुट्टी ले रहा है तो मैं भी काम पर नहीं आऊंगी. पर फेसबुकपर मुझे साहत तो मिले थे, उन्होंने नही बताया आपको? आपने ही नहीं देखा पूरी दुनिया ने देखा, मेरा पोस्ट. अमेरिका, लंडनसे मुझे ढेर सारे मॅसेसेज आए की मैं छुट्टी कैस मनाऊ!'' आता बोला, ही जर अशीच प्रगती होत राहिली तर वर सांगितलेली संभावना दिसणार नाही. मग दुसरं दृश्य बघा - आजकाल जोगोजागी पाट्या दिसू लागल्या आहे की, पार्टी करत आहे, तर स्वयंपाक तयार करून मिळेल, आपण तेथे जातो आणि 10-15 लोकांचे स्वयंपाकही तयार करून घेतो. आपल्या पूर्वीच्या पीढीला धक्काच बसेल की 10 माणसांकरिता बाहेरून स्वयंपाक, पण हे खर आहे ना? हं तर मी म्हणत होत की तशाच पाट्या राहतील फक्त मजकूर बदललेला राहील. त्यात असं लिहिलेलं असेल की 'इथे हळदी कुंकु लावणारे रोबोट मिळतात.'' त्या दुकानात शिरल्यावर निर निराळे हळदी कुंकु लावणारे रोबोट राहतील. पण एक लक्षात ठेवा की 10-15 बायकांना हळदी कुंकु लावणारे रोबोट पटकन मिळणार नाही. ते बिजी असतील आणि जर 20-25 बायकांना लावणारा रोबोट घेतला तर तेवढ्या बायका शोधून ठेवावया लागतील, कारण त्यात तेवढं हळद आणि कुंकु भरलं की ते बाहेर काढता येणारनाही. तो रोबोट ऑटोमेटिक राहील त्याला 20 कपाळं तर घ्यावीच लागतील. एक दृश्य असही असू शकतं की एक असा सॉफ्टवेअर बनेल की नेट उघडल्या बरोबर कपाळावर हळदी कुंकु लागेल आणि डाळीचा व करंजीचा सुवास दरवळेल. अगदी खालल्या सारखी अनुभूती होईल. किंवा एक सीन असा ही असू शकतो की झाड्यांच्या बोसांई सारखं करंजीच पण बोंसाई होईल आणि कुरियरवाला ती करंजी व थोडीशी डाळ लिफाफ्यात ठेऊन देऊन जाईल. लिफाफा दिल्याबद्दल स्वाक्षरी न घेता हळदी कुंकु लावून जाईल. एक शेवटची आणि रम्य शक्यता मला दिसत आहे की पुढच्या काळात 'युनीसेक्स हळदी कुंकु सेलिब्रेशन' अशी पाटी सुद्धा बघायला मिळेल. कारण जर कोर्टाने परवानगी दिली तर तशी लग्न होईल, मग त्यांचे हळदी कुंकु नकोका व्हायला. पटत आहे न माझं म्हणण. जर खरच पटत असेल तर आजपासून देवधर्म बंद करा व मुक्तीची कामना ही करू नका. दुसरा जन्म घ्या आणि ही सर्व गंमत बघायला हजर रहा कारण ह्या भगिनी मंडळांच हळदी कुंकु जन्म जन्मांतर असचं स्फूर्तीने चालत राहणार आहे, त्यासाठी माझी मनापासून शुभेच्छा पण आहे!!