Dharma Sangrah
✕

Holi Special Sweet Recipes होळी विशेष लोकप्रिय गोड पदार्थांच्या पाककृती

Updated: मंगळवार, 24 फेब्रुवारी 2026 (22:14 IST)
साहित्य: ओले खोबरे (किसलेले), साखर किंवा गूळ, ड्राय फ्रूट्स, वेलची पूड, मैदा आणि तूप.
कृती: ओल्या खोबऱ्याचे सारण (खोबरे + साखर शिजवून) तयार करा. मैद्याच्या पारीमध्ये हे सारण भरून करंजीचा आकार द्या आणि मंद आचेवर तळून घ्या.
करंजी खुसखुषित होण्यासाठी मैद्यात कडकडीत तेलाचे 'मोहन' घाला.
 

केशरयुक्त थंडाई  

होळीच्या दिवशी शरीराला थंडावा देण्यासाठी 'थंडाई' हे पेय खास बनवले जाते.
साहित्य: दूध, साखर, बदाम, काजू, पिस्ता, खसखस, बडीशेप, मिरी, वेलची आणि केशर.
कृती: सर्व सुका मेवा आणि मसाले भिजवून त्यांची बारीक पेस्ट करा. हे मिश्रण उकळलेल्या दुधात साखर आणि केशरासोबत मिसळा. थंड झाल्यावर गाळून सर्व्ह करा.थंडाईमध्ये गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्या घातल्यास छान सुंगध येतो.
 

रसाळ मालपुआ 

होळीच्या सणाला उत्तर भारतात मालपुआ आणि रबडीचा बेत हमखास असतो.
साहित्य: मैदा, रवा, दूध, बडीशेप पूड, साखर (पाकासाठी) आणि तूप.
कृती: मैदा, रवा आणि दुधाचे घट्टसर मिश्रण तयार करा. साजूक तुपात याचे छोटे पॅनकेक्स तळून घ्या आणि नंतर साखरेच्या पाकात २-३ मिनिटे बुडवून ठेवा.
हे गरम मालपुए थंडगार रबडीसोबत खाल्ल्यास स्वर्गसुख मिळते!
 

रव्याची खीर किंवा शेवयांची खीर

झटपट काहीतरी गोड बनवायचे असेल तर खीर हा उत्तम पर्याय आहे.
साहित्य: दूध, साखर, भाजलेला रवा किंवा शेवया, चारोळी, बदाम-पिस्त्याचे काप आणि वेलची पूड.
कृती: दूध आटवून त्यात भाजलेला रवा/शेवया आणि साखर घाला. मिश्रण थोडे घट्ट झाले की त्यात सुका मेवा आणि वेलची पूड टाकून गरमागरम सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: होळी विशेष रेसिपी Coconut Roll
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Holi 2026 होळी विशेष नैवेद्याच्या ताटात महत्त्वाचे पारंपारिक पदार्थ पाककृती

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

केसांना दही लावण्याचे फायदे जाणून घ्या; केस होतील मऊ, मजबूत आणि चमकदार!

नवरात्रीच्या उपवासात सफरचंद आणि डाळिंब खाण्याचे फायदे; शरीराला मिळतील ‘हे’ आरोग्यदायी लाभ!

गर्भधारणेच्या सुरुवातीला योग करताना या गोष्टींची काळजी घ्या

जातक कथा : सुंदर गुलाब आणि काटे यांची हृदयस्पर्शी गोष्ट

पतीला कधीही सांगू नयेत अशा ५ गोष्टी: स्त्रियांनी ही माहिती नेहमी लक्षात ठेवावी!

पुढील लेख
Show comments