शिक्षक दिनानिमित्त : पूर्वी सारखा शिक्षक आज आहे का?

teachers day
Last Updated: मंगळवार, 3 सप्टेंबर 2019 (14:25 IST)
शिक्षक दिनानिमित्त बरेच लेख वाचले शिक्षकांच भरभरुन कौतुक केलं गेल. पण खरच पूर्वी सारखा शिक्षक आज आहे का? किती शिक्षक पोटतीळकीने विद्यार्थ्यांना शिकवतात? किती विद्यार्थी शाळेत म्हणा किंवा कॉलेजला खरच शिकण्यासाठी जातात का ? कि निव्वळ टाईमपास जातात? शिक्षण पद्धतीही याला तेवढीच जबाबदार आहे. लेखातून शिक्षकांची मने दूखवण्याचा तसा मुळीच हेतू नाही पण नायईलाजास्तव सारं लिहाव लागत. एका शिक्षकानेच जर सार्या शिक्षण पद्धती विरोधात वाचा फोडली नाही तर भविष्यात असल्या शिक्षण पद्धतीचा काय उपयोग असेल?
शिक्षक आई वडींलानंतर दूसरा गुरु असतो मग शिक्षक जसा तसेच विद्यार्थी घडतील. माझ स्वत:च उदाहरण देतो. लहान असताना ज्या मराठी शाळेत आम्ही जायचो मुळात आता सद्यस्थितीत ते सर्व गुरु वर्य निवृत्ती वर आहेत. घरी बसून पेंशन घेत असतील पण आमच्या सारख्या हजारोंविद्यार्थ्याच नुकसान झालय. मराठी शाळा असल्यामुळे इंग्रजीचा मोठा धोका जस हा विषय आमचा जाणीदूश्मन होता. पण कालांतराने बर झाल इंग्रजी थोड्या काही प्रमानात शिकलो इंग्रजी. ही काय फक्त आमचीच परिस्थीती नाही तर हजारो मुलांची हीच परिस्थीती होती. शिक्षकांना आपण पगार का देतो याचा त्यावेळच्या शिक्षकांनी थोडा तरी विचार करायला हवा होता .ह्या असल्या शिक्षकांमुळेच आज मुलांना पालक वर्ग मराठीत नाही तर कॉंव्हेन्टला इंग्लिश मेडीयमला टाकतो. त्या पाल्याला काही एक शब्द जरी समजत नसला तरी इंग्लिश मेडीयम ला त्या पाल्यला प्रवेश दिलेला असतो. कालांतराने मराठी शाळा बंद होत आहेत. यात चुक काय मी सांगीतल्याप्रमाणे फक्त शिक्षकांचीच नाही तर पालकांची ही आहे. आज आपण आपल्या पाल्याचा अभ्यास घेतो का ? मुळात गोष्ट अशी आहे की पालकांनाच किती येत हेही महत्वाचच आहे. पण आपल्याच काही येत नाही मग शिकवणी लावायची आणि भरमसाट फि भरुन शिकवायचा. का तर फक्त मार्क मिळतील म्हणुन हा सारा खटाटोप आहे. ह्यामुळे बराच शिक्षकवर्ग खाजगी शिकवणी घेतो. अन पाल्य पण फक्त खाजगी शिकवणी आहे म्हणून शाळेत दुर्लक्ष करतो. मार्कांच्या ह्या लढाईत पाल्य अन पालक दोघांचाच बळी जातो. खाजगी शिकवणी वाले भरमसाट पैसा कमवत आहेत.

खरच कुणी ह्या धावपळीत नियोजन करायच लक्षात ठेवतो का? कि भविष्यात आपला पाल्य काय होणार आहे हा विचार करतो का? का फक्त पालक शिकवतच राहतो मग शेवटी आऊटपुट काहीच येत नाही. गोळा बेरीज झिरो असते. मग
पालकांनी आणि पाल्यांनी योग्य ते नियोजन करन गरजेच आहे. आपला पाल्य कशात हूशार आहे हे पारखून घेण याचा शोध घेण पालकांच काम आहे. 12 वी नंतर पाल्याने कुठल क्षेत्र निवडायच हे महत्वाच आहे. शिक्षकांचही ह्यात योग्य ते मार्गदर्शन अपेक्षीत असत. आपण शिकतो कशासाठी तर मोठा झाल्यावर पैसे कमवणे हा हेतू तर असतोच पण समाजात मानसन्मान, आपली जीवन जगण्याची पद्धत समाजाचा आपल्या कडे बघण्याचा दृष्टीकोण सार काही बदलत. शिक्षण झाल अन मेहनती शिवाय जॉब नाही पण मेहनत योग्य त्या मार्गदर्शनात झाली पाहीजे नाही तर मेहनत वायाही जाऊ शकते.

सरकारनेही यात योग्य तसा हातभार लावलाच पाहीजे मदत केली पाहीजे. शिक्षण पद्धतीवर योग्य तश्या तज्ज्ञांकडून सर्वे झाला पाहीजे त्यावर अभ्यास झाला पाहीजे. व्यवहारीक ज्ञान मिळेल अस
शिक्षण दिल गेल पाहीजे. शासनाचा ह्यात खुप मोठा सहभाग असायला हवा. संगणक युग आहे मग संगणकाच प्राथमिक शिक्षण तर मिळतच पण नवनवीन तंत्रज्ञान येत आहे ततेही शिक्षण मिळायला हव. आज शिक्षण पद्धती जर सुधरली तर बर्याच समस्या सुटतील.

मग चलातर एकच ध्यास धरुयात ह्या शिक्षण दिनी सुधरावी शिक्षण पद्धती व्हावी विद्यार्थी विकास.
- विरेंद्र सोनवणे


यावर अधिक वाचा :

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा ...

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'
केंद्र सरकार महसुलाच्या माध्यमातून मिळत असलेले पैसे योग्य प्रमाणात राज्य सरकारांना वाटप ...

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय
पीएम मोदींनी पुन्हा एकदा जगात एक जबरदस्त विजय मिळवला आहे. टाइम मासिकाने प्रसिद्ध केलेल्या ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का?
यूकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर, यूकेतील 12 ते 15 वर्षं वयोगटातील ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि रा. स्व. संघ हे 'महिला विरोधी' आणि 'हिंदू ...

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम
कोकणामध्ये “कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम” राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या ...

भाजप प्रवेशाचे ‘ऑफर लेटर’ घेऊन आम्ही फिरत नाही; फडणवीसांचा ...

भाजप प्रवेशाचे ‘ऑफर लेटर’ घेऊन आम्ही फिरत नाही; फडणवीसांचा पलटवार
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती,असा खळबळजनक ...

पुण्यात लग्नास नकार दिल्याने सर्वांसमोर महिलेचा फाडला गाऊन; ...

पुण्यात लग्नास नकार दिल्याने सर्वांसमोर महिलेचा फाडला गाऊन; मग -
लग्नास नकार दिल्याने अश्लिल शिवीगाळ करणार्‍याला महिलेने जाब विचारला. तेव्हा त्याने ...

WhatsApp Tips: व्हॉट्सअॅप वर आलेला मेसेज बनावट आहे की खरा, ...

WhatsApp Tips: व्हॉट्सअॅप वर आलेला मेसेज बनावट आहे की खरा, असे ओळखा
व्हॉट्सअॅप टिप्स: सध्या इंटरनेटच्या युगात मेसेजचा पूर सर्व सोशलमिडीयावर आला आहे.या मध्ये ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कटात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे फसले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कटात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे फसले
हळूहळू आता सर्वत्र सुरळीत होत असतानाच सिनेसृष्टीही पूर्वपदावर येऊ लागली आहे. अनेक ...

रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे आणखी ‘गोत्यात’; ...

रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे आणखी ‘गोत्यात’; जाणून घ्या प्रकरण
संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणार्‍या रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठे याने ...