1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. व्हॅलेंटाईन डे
Written By वेबदुनिया|

प्रिया प्रिया प्रिया‍ ऽऽऽऽऽऽ

स्व. सौ. मीना आठल्ये

प्रिया प्रिया प्रिया‍ ऽऽऽऽऽऽ
NDND
पाहते प्रिया मी वाट
पसरल्या धुक्यात दाट
पश्चिमेस उधळले केशरी रंग सांजचे
पाखरेही परतली शिखांतरीच जायचे
मृदुल रेशमी बंधनात
पाहते प्रिया मी वाट।।1।

कुंज रातराणीचे धुंद गंध उधळुनी
धरा अधीर जाहली अमृत सिंचन प्राशनी
प्रीतीमाळ करतलात। पाहते प्रिया मी वाट।।2।।

आर्त भाव आळविले प्रीतीगीत गुंफिले
सूर सूर जुळविले हृदयतार छेडिले
मधुर मानस मंदिरात। पाहते प्रिया मी वाट।।3।