मिताली व तिची आई रेल्वे प्रवास करत असताना मितालीला राहूल नावाचा एक चांगला मित्र मिळाला होता. प्रवासादरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. ती चांगली घनिष्टही झाली. पण प्रवासानंतर वेगळे व्हावे लागणारच होते, म्हणून राहूलने तिच्या लहान भावाच्या घरचा दूरध्वनी क्रमांक घेतला होता.
स्टेशनवर उतरताना राहूलने तिच्या आईला घरी येण्याचे निमंत्रण दिले आणि तो निघून गेला. परंतु, राहूलचे मन कशातच लागत नव्हते. त्याला नेहमी रेल्वेतील आठवणी येत होत्या. काय करावे काय सुचत नव्हते? एक दिवस अचानक मितालीची चौकशी करण्यासाठी त्याने तिच्या घरी फोन केला. मितालीविषयी विचारले असता तिच्या आईने लगेच मितालीला फोन दिला. फोनवर अशा काही गप्पा झाल्या की, अचानक दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
ND
ND
काही दिवसानंतर मिताली राहूलला देण्यासाठी एक भेटवस्तू घेऊन आली. या भेटवस्तूबद्दल तिने आपल्या आईला सर्व काही सांगितले होते. त्यामुळे तिच्या आईनेही तिला विरोध केला नाही. संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही आईने तिला दिली. आता मिताली आणि राहूल आपल्या प्रेमाचा पहिल्या व्हॅलेंटाइन डे ची आतुरतेने वाट पाहत आहेत.