प्रिया प्रिया प्रिया ऽऽऽऽऽऽ  
					
										
                                          स्व. सौ. मीना आठल्ये
                                       
                  
                  				  				  													
						
																							
									   पाहते प्रिया मी वाटपसरल्या धुक्यात दाटपश्चिमेस उधळले केशरी रंग सांजचेपाखरेही परतली शिखांतरीच जायचेमृदुल रेशमी बंधनातपाहते प्रिया मी वाट।।1।।कुंज रातराणीचे धुंद गंध उधळुनीधरा अधीर जाहली अमृत सिंचन प्राशनीप्रीतीमाळ करतलात। पाहते प्रिया मी वाट।।2।।  आर्त भाव आळविले प्रीतीगीत गुंफिलेसूर सूर जुळविले हृदयतार छेडिलेमधुर मानस मंदिरात। पाहते प्रिया मी वाट।।3।।