रंगीबिरंगी व्हॅलेंटाईन डे साजरा करा
प्रियकर-प्रेयसीसाठी तसा प्रत्येकच दिवस प्रेमाचाच असतो. पण तरी देखील व्हॅलेंटाईन डेचे एक वेगळे महत्त्व आहे. आपल्या जोडीदाराला या दिवशी फूल दिले तर मग काय बहार येते. प्रेमाची आठवण म्हणून या दिवशी फूल दिले जाते. फुले मन जोडतात. म्हणून तर एखाद्या रूग्णालाही भेटण्यासाठी जाताना फूलच का देतात? फुल देण्यामागचा अर्थ काय? यातून काय संदेश मिळतो? हे जाणून घेऊ आणि आपणही रंगीबिरंगी गुलाबांसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करू या. पांढरा गुलाबलवकरच तुमच्या आयुष्यात कोणीतरी येणार असा संदेश देतो. या रंगाचे गुलाबाचे फूल वडील आपल्या मुलीस आणि मुले आपल्या आईला देतात. हा रंग निर्मळ प्रेमाचे प्रतीक मानला जातो.