मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. व्हॅलेंटाईन डे
Written By वेबदुनिया|

व्हॅलेंटाईन पार्टीसाठी केशरचना

NDND
स्त्रियांचे घनदाट काळे केस प्रत्येकाला आ‍कर्षित करतात. आपल्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावे असे वाटत असेल तर केशरचना नीटनेटकी असणे आवश्यक आहे. व्हॅलेंटाईन पार्टीच्या काही दिवस अगोदर आपल्या केसांना शॅम्पू़, हिना किवा कंडीशनरने कंडीशन करा. आपल्याला कलरींगची आवड असेल तर विंटेज अंबर, एश अंबर, वाइल्ड अंबर किंवा सोनेरी रंगाने केस रंगवा.

व्हॅलेंटाइन डेला परिधान करायचे कपडे अगोदरच निवडून ठेवा आणि त्यानुसारच केशरचना करा. आपले केस लांबसडक असतील तर आपल्याला बुचडा अधिक शोभून दिसेल. लहान केसांवर मल्टी कलर स्टिकींग किंवा सुंदर दिसण्यासाठी पोनी (वेणी) करू करू शकता.

चेहर्‍यानुसार केशरचना
आपला चेहरा लहानसा असेल तर कर्ल आणि वेणींना मिळून बाऊंसी लुक दिला जावू शकतो. केसांना पसरवू देऊ नका. केसाची बांधणी अशा प्रकारे करा की आपला चेहरा मोठा दिसला पाहिजे.

जर लांब चेहर्‍याची मुलगी असेल तर केस मागच्या बाजूने बांधा. केस मोकळे ठेवू इच्छित असाल तर त्यांना डाव्या बाजूने ठेवा म्हणजे आपला चेहरा झाकला जाणार नाही.

चेहरा थोडासा जाड असेल तर अशी केशरचना करा, की चेहरा थोडासा झाकला जाईल. जाड चेहरा जेवढा केसांनी झाकला जाईल तेवढा सुंदर दिसेल.

आपल्या चेहर्‍याचा आकार गोलाकार असेल तर सेंटरवरून केसाला उचलून माग‍ील बाजूस ठेवा आणि चेहरा झाकून ठेवा. आवश्यकता असल्यास साइडने फ्लिक्स किंवा कर्ल ठेवू शकता.

आपले केस मोकळे ठेवू इच्छित असाल तर, कान केसांनी झाकायचा प्रयत्न करा. एका बाजूने चेहरा झाकलेला ठेवा. केस मोकळे ठेवून त्यांना आयरींग करू शकता. खास व्हॅलेंटाइन डे साठी रेड हार्ट शेप किंवा इतर अन्य डिझायनर क्लिप बाजारात उपलब्ध आहेत.

NDND
आऊटफिटनुसार केशरचना
साडी घालणार असाल तर केशरचनाही तशीच हवी. साडीबरोबर थोडा हेवी मेकअप केला तर तिच्या सौदर्यांत वाढ होते. केस पातळ असतील तर 'आर्टीफीशियल बन' च्या मदतीने केसांना वरच्या बाजूला सेट करा. ते खूप आकर्षक दिसतील. जिन्सबरोबर केस मोकळे सोडू शकतात. पंजाबी ड्रेस परिधान केला असेल तर केसांची वेणी बांधा. केस लांबसडक असतील तर लांब वेणी अधिक आकर्षक दिसेल.

'व्हॅलेंटाईन डे'च्या कार्ड्‍ससाठी येथे क्लिक करा....