शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

पूजा करताना नका करू या 4 चुका (व्हिडिओ)

प्रत्येक घरात सकाळी लोकं घराबाहेर पडण्याआधी देवाची पूजा करतात. परंतू अनेकदा नकळत अश्या काही लहान चुका करतात ज्यामुळे पूजेचं फल तर प्राप्त होत नाही उलट वाईट परिणाम बघायला मिळतात. म्हणून पूजा करताना या 4 चुका अजिबात करू नये.
तुळशीचे कोरडे पाने
श्रीकृष्णाला आणि विष्णू या देवांना प्रसादासह तुळस अर्पित करण्याचे खूप महत्त्व आहे. अनेक लोकं खूप सारी तुळस तोडून जमा करून ठेवतात आणि त्याची पाने कोरडी पडली असली तरी देवाला अर्पित करतात. असे करणे अशुभ आहे. रोज ताजी पाने अर्पित करावी.
 
खंडित दिवा
पूजेत उपयोग केला जाणारा दिवा खंडित नसला पाहिजे. दिवा तुटका- फुटका असल्यास लगेच वापरणं बंद करावा.

वाळलेले हार किंवा फुलं
अनेकदा लोकं देवांच्या फोटोवर किंवा मूर्तीवर हार किंवा फुलं अर्पित करून मोकळे होतात. ते वाळल्यावर हार काढणे विसरतात. म्हणून पूजेनंतर संध्याकाळ होण्यापूर्वी फुलं मंदिरातून हटवले पाहिजे.
खंडित मुरत्या
घरात किंवा मंदिरात कोणत्याही प्रकाराची तुटकी-फुटकी मूर्ती ठेवू नये. घरात माती किंवा धातूची मूर्ती खंडित झाली असल्यास लगेच नदीत विसर्जित करावी किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्यावी.