मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

घरात येथे शौचालय असल्या दारिद्र्य येतं

घर बांधताना शौचालयाची जागा कुठे असावी, याविषयी सावधगिरी बाळगायला पाहिजे. तसे केले नाही तर सकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन जीवनात अशुभ काळ सुरू होऊ शकतो. यात आर्थिक अडचणी, प्रगतीत बाधा, घरात आजारपण असे प्रकार घडतात. 
 
घराच्या प्रवेशद्वारासमोर शौचालयाचे दार नको, अन्यथा घरात नकारात्मक ऊर्जेचा सदैव प्रवेश थेट शौचालयात होतो. 
 
झोपताना शौचालयाचे दार तुमच्या तोंडासमोर नको. 
 
ईशान्य कोपर्‍यात कधीही शौचालयाची निर्मिती करू नये. 
 
शौचालयाची योग्य जागा दक्षिण-पश्चिम किंवा दक्षिण दिशेत असायला हवी. पश्चिम दिशासुद्धा चालेल. 
 
शौचालयाचे दार देवघर, स्वयंपाक घराच्या समोर उघडायला नको. 
 
या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन सकारात्मक ऊर्जा आपण मिळवू शकतो व नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहू शकतो.