वास्तुप्रमाणे असावे बेडरूम
बेडरूम ही अशी जागा आहे जेथे पती-पत्नी आपले सुखाचे क्षण घालवतात. नवरा-बायकोच्या प्रेमाची साक्ष असलेली ही खोली अशी हवी की त्यात प्रवेश केल्याबरोबरच तेथे शांततेचा अनुभव आला पाहिजे.
तुमची बेडरूम वास्तु अनुरूप असेल तर तुमच्या संबंधांवर व कार्यशैलीवर त्याचा प्रभाव पडतो. दांपत्यजीवन सुखी आणि शांत ठेवण्यासाठी बेडरूमची रचना व तेथील सजावट वास्तु अनुरूप असायला हवी. रात्री झोप चांगली झाली तर सकाळी मनाला प्रसन्न वाटते. पण काही वेळा रात्रभर झोप लागत नाही. त्यामुळे पूर्ण दिवस तणावात जातो. वास्तुशास्त्रानुसार हे सर्व बेडरूमची दिशा योग्य नसल्यामुळे घडतं.
* वास्तू काय म्हणते?
दांपत्याच्या सुखसमाधानासाठी गृहस्वामीची बेडरूम दक्षिण-पश्चिम किंवा पश्चिम दिशेत असायला पाहिजे. कारण या बेडरूमला 'मास्टर बेडरूम' असे ही म्हणतात. ही खोली आयताकार असून त्यात अटॅच लेट-बाथ उत्तर-पश्चिम दिशेत असणे वास्तूशास्त्रानुसार चांगले असते.
दार किंवा खिडक्या कुठल्याही खोलीचा महत्त्वपूर्ण भाग असतो. त्याद्वारे खोलीत सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. वास्तुदोषापासून वाचण्यासाठी बेडरूमचे मुख्य द्वार उत्तर-पूर्व दिशेला असायला हवे. हे लक्षात ठेवायला हवे की या खोलीत दक्षिण-पश्चिमेकडे एकही खिडकी नसावी.
बर्याचदा खोली सजविताना त्याच्या प्रत्येक भिंती व कोपर्यात सामान ठेवतो. त्यामुळे ते सुंदर दिसते पण वास्तूशास्त्रानुसार मास्टर बेडरूम सामानाने भरणे चांगले नाही. या खोलीत कमीत कमी सामान व कमी वजनाचे फर्निचर ठेवायला हवे.
* बेड असा असावा
बेडरूममधील महत्त्वाचा भाग म्हणजे 'बेड'. बेडचा बहूतांश भाग दक्षिण-पश्चिम दिशेकडे असायला हवा.
झोपताना नेहमी दिशेचे भान ठेवायला हवे. जोडीदाराचे डोके नेहमी दक्षिणेकडे आणि पाय उत्तरेकडे हवे. कधीही बेडरूममध्ये बेडच्या समोर टी. व्ही. किंवा ड्रेसिंग टेबल नसावा. हे असले तर एखाद्या तिसर्या व्यक्तीची उपस्थिती खोलीत आहे, असे वाटते.
वास्तुनुसार बेडरूमची रचना व सजावट केली गेली तर या खोलीत सदैव प्रेमाचाच वर्षाव राहील आणि वैवाहिक जीवन जन्मभर प्रेमळ राहील. वास्तुशास्त्र म्हणजे दिशांचा खेळ आहे.