शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By वेबदुनिया|

घरातील वादविवादांना द्या मूठमाती

घरात वारंवार होणार्‍या वादविवादांपासून मुक्ती मिळविण्यासाठी घरातील कर्ता पुरूष विविध प्रकारच्या उपाययोजना करत
असतो. वास्तुशास्त्रानुसार जर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असेल तर येणारा प्रत्येक दिवस नवीन वाद घेऊन येत असतो.

घरात सुशोभिकरण व टापटिपपणा असल्याने वातावरण प्रसन्न रहाते. त्यामुळेही वादविवादाला काही प्रमाणात खीळ बसू शकते. घरात नीटनेटकेपणा असला तर सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते व घरातील सदस्यांच्या विचारात परिवर्तन घडवून आणते. आजच आपल्या घरात काही नवीन प्रयोग करून पाहा. त्यामुळे तुमच्या घराच्या सौंदर्यात वाढ होण्यासह सकारात्मक ऊर्जाही संचार करेल.

* नकारात्मक ऊर्जा कशी येते?
वास्तुशास्त्रानुसार ज्या बिनकामाच्या वस्तू अडगडीच्या ठिकाणी पडून आहेत त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. नकारात्मक ऊर्जा वावरत असलेल्या घरात आजार, दु:ख वास करत असतात. आपल्या कुटुंबातील सदस्यांना सुख-शांती लाभावी म्हणून या जुनाट वस्तू घराबाहेर काढाव्यात व उपयोगी वस्तू घरात ठेवाव्यात.

* सकारात्मक उर्जेसाठी काय करावे?
1. घरातील वस्तूंवर बसलेली धूळ दररोज साफ करावी. तसे केल्याने घरात येणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो.
2. बंद पडलेल्या भिंतीवरील घड्याळ व बिनकामाचे सामान बाहेर काढा.
3. देव-देवतांच्या मूर्ती शोकेसमध्ये ठेवू नका.
4. एकच देवाच्या एकापेक्षा जास्त प्रतिमा वा मूर्ती घरात ठेवू नका.
5. घरात सामानाची गर्दी होणार नाही याची काळजी घ्या व घर मोकळे ठेवा.
6. घराच्या सजावटीसाठी मातीचे भांडे, घागरी आदींचा उपयोग करा. मात्र त्यांना रिकामे ठेवू नका त्यात सुगंधित फुले अथवा काही शोभेच्या वस्तू ठेवा.
7. लहान मुलांच्या जुन्या खेळण्याची नियमित साफ-सफाई करा.