सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By

जिन्याचे वास्तुदोष दूर करा

वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे जिना उत्तर- दक्षिण दिशेकडे किंवा पूर्व- पश्चिम दिशेकडे असला पाहिजे. पूर्वीकडे जिना बनवताना लक्षात ठेवायला हवं की जिना पूर्वीदिशेच्या भिंतीकडे नसावा. तिथे बनवायचाच असेल तर भिंतीपासून त्याचे अंतर कमीत कमी 3 इंच असल्यास घर वास्तुदोष मुक्त राहील.
 
घरामध्ये जिना गोलाकार नसून आयताकृती, चौकोनी आकाराचा असावा. तसेच पायर्‍या चढताना उजवीकडे वळणारा असावा.


 
जिन्यासाठी नैऋत्य अर्थात दक्षिण दिशा उत्तम असते. या दिशेत जिना असल्यास घरात प्रगती होते. वास्तुशास्त्राप्रमाणे उत्तर-पूर्वी अर्थात ईशान्य दिशेला जिना नसावा. याने आर्थिक संकट, आरोग्याची तक्रार, आणि नोकरी-व्यवसायात समस्या उद्भवतात. याव्यतिरिक्त दक्षिण पूर्वेत जिना असणेही वास्तुप्रमाणे योग्य नाही. याने मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो.
 
जे स्वता तळमजल्यावर राहतात आणि वरच्या मजल्यावर भाडेकरू ठेवतात त्यांनी मेन गेटच्या समोर जिना बांधायला नको याने भाडेकरूंची उन्नती तर होते पण घरमालकाची समस्या वाढत राहते.
 

वास्तुदोष दूर करण्याचे उपाय...

जिन्याचे वास्तुदोष दूर करण्याचे उपाय:
 
1. जिन्याच्या दोन्ही बाजूला दारं असावे.
 
2. जिन्याच्या खाली जोडे-चपला किंवा अटाळा ठेवू नये.
 
3. जिन्याखाली मातीच्या भांड्यात पावसाचं पाणी भरून त्याला मातीच्या झाकणाने झाकावे.