शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. स्वातंत्र्य दिन
Written By
Last Updated : सोमवार, 12 ऑगस्ट 2019 (12:14 IST)

15 ऑगस्ट : तुम्हाला माहीत आहे का, या दहा गोष्टी?

भारताच्या स्वाधीनता आंदोलनाचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले होते. पण जेव्हा देशाला 15 ऑगस्ट, 1947ला आझादी मिळाली तेव्हा ते या उत्सवात सामील झाले नाही.  
 
भारताच्या स्वातंत्र्याशी निगडित 10 मनोरंजक गोष्टी  
 
 1. महात्मा गांधी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दिल्लीहून हजारो किलोमीटर दूर बंगालच्या नोआखलीमध्ये होते, जेथे त्यांनी हिंदू आणि मुसलमानांमधील सांप्रदायिक हिंसेला रोखण्यासाठी उपोषण केले होते.  
 
2. जेव्हा निश्चित झाले की भारत 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र होणार आहे तेव्हा जवाहर लाल नेहरू आणि सरदार वल्लभ भाई पटेल यांनी   महात्मा गांधींना पत्र पाठवले. या पत्रात लिहले होते, "15 ऑगस्ट आमचा पहिला स्वाधीनता दिवस असेल. तुम्ही राष्ट्रपिता आहात. यात सामील हून आपला आशीर्वाद आम्हाला द्या."
3. गांधीजींनी या पत्राच्या उत्तरात लिहिले, "जेव्हा कलकत्तेत हिंदू-मुस्लिम एक दूसर्‍याच्या जीव घेत आहे, अशात मी कसा या उत्सवात सामील होऊ शकतो. मी दंगा रोखण्यासाठी आपला जीव देऊ शकतो."
 
4. जवाहर लाल नेहरू यांनी ऐतिहासिक भाषण 'ट्रिस्ट विद डेस्टनी' 14 ऑगस्टच्या मध्यरात्री वायसराय लॉज (सध्याचा राष्ट्रपती भवन)हून दिले होते. तेव्हा नेहरू पंतप्रधान नाही बनले होते. या भाषणाला संपूर्ण जगाने एकले, पण गांधी त्या दिवशी 9 वाजता झोपायला चालले गेले.  
 
5. 15 ऑगस्ट 1947ला लॉर्ड माउंटबॅटनने आपल्या ऑफिसमध्ये काम केले. दुपारी नेहरूंनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळाची यादी सोपवली आणि नंतर इंडिया गेटजवळ प्रिसेंज गार्डेनमध्ये एका सभेला संबोधित केले.  
 
6. प्रत्येक स्वतंत्रता दिवसाच्या दिवशी भारतीय पंतप्रधान लाल किल्ल्याहून ध्वजारोहण करतात. पण 15 ऑगस्ट, 1947ला असे झाले नाही.  लोकसभा सचिवालयाच्या एका शोध पत्रानुसार नेहरूने 16 ऑगस्ट, 1947ला लाल किल्ल्याहून ध्वजारोहण केले होते.
7. भारताचे तत्कालीन वायसराय लॉर्ड माउंटबॅटनचे प्रेस सचिव कँपबेल जॉन्सननुसार मित्र देशाच्या सेनासमोर जपानच्या समर्पणाची दुसरी  वर्षगांठ 15 ऑगस्टला पडत होती, याच दिवशी भारताला स्वतंत्र आझाद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  
 
8. 15 ऑगस्टपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमा रेषेचा निर्धारानं झाला नव्हता. याचा निर्णय 17 ऑगस्टला रेडक्लिफ लाइनच्या घोषणेद्वारे झाला होता.  
 
9. भारत 15 ऑगस्ट आझाद जरूर झाला, पण त्याचे कुठले ही राष्ट्रगीत नव्हते. रवींद्रनाथ टॅगोर जन-गण-मन 1911मध्येच लिहून चुकले होते, पण हे राष्ट्रगीतम्हणून 1950 मध्येच बनला.  
 
10. 15 ऑगस्ट भारताशिवाय तीन इतर देशांचा देखील स्वतंत्रता दिवस आहे. दक्षिण कोरिया जपानहून 15 ऑगस्ट, 1945ला आझाद झाला होता. ब्रिटनहून बहरीन 15 ऑगस्ट, 1971ला आणि फ्रांसहून कांगो 15 ऑगस्ट, 1960 स्वतंत्र झाला होता.