Marathi Biodata Maker
✕

मशरूम पासून झटपट ३ स्वादिष्ट स्नॅक्स! delicious snacks from mushrooms

Updated: गुरूवार, 22 ऑक्टोबर 2026 (18:26 IST)
 
क्रिस्पी गार्लिक बटर मशरूम (Garlic Butter Mushroom)
साहित्य: मशरूम (धुऊन-पुसून घेतलेले), २ चमचे लोणी (Butter), बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची, चिली फ्लेक्स, ओरिगांनो आणि कोथिंबीर.
 
कृती:
पॅनमध्ये बटर गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण आणि हिरवी मिरची परता. त्यात अक्खे किंवा अर्धे कापलेले मशरूम घाला. मशरूम पाणी सोडतील; मध्यम-मोठ्या आचेवर पाणी आटेपर्यंत ५-७ मिनिटे परता. शेवटी वरून मीठ, चिली फ्लेक्स, ओरिगांनो आणि कोथिंबीर घालून गरम-गरम सर्व्ह करा.
 
मशरूम स्टफ्ड चीज बाइट्स (Stuffed Cheese Mushroom)
साहित्य: मोठे बटण मशरूम, किसलेले चीज (मोझरेला किंवा प्रोसेस), बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, काळी मिरी पूड आणि मीठ.
ALSO READ: Birthday Surprise Recipe मशरूम राईस चीज समोसा बनवून मुलांना वाढदिवसाला द्या सरप्राईज
कृती:
मशरूमचे दांडे काढून रिकामी वाटीसारखा भाग तयार करा. काढलेले दांडे बारीक चिरून घ्या. एका कढईत थोडे तेलात चिरलेले दांडे, कांदा आणि शिमला मिरची २ मिनिटे परतून घ्या. हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात चीज, मीठ आणि काळी मिरी पूड मिसळा. हे स्टफिंग मशरूमच्या वाट्यांमध्ये भरा आणि तव्यावर किंवा ओव्हनमध्ये चीज वितळेपर्यंत (५-८ मिनिटे) मंद आचेवर झाकण ठेवून बेक/शेकून घ्या.
 
मशरूम ६५ (Crispy Mushroom 65)
साहित्य: मशरूमचे तुकडे, २ चमचे कॉर्नफ्लॉवर, २ चमचे तांदळाचे पीठ, १ चमचा मैदा, आले-लसूण पेस्ट, तिखट, गरम मसाला, कढीपत्ता आणि मीठ.
 
कृती:
एका भांड्यात कॉर्नफ्लॉवर, तांदळाचे पीठ, मैदा, आले-लसूण पेस्ट, तिखट, गरम मसाला आणि मीठ थोडे पाणी घालून घट्ट पेस्ट बनवा. मशरूमचे तुकडे या मिश्रणात घोळवून गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. दुसऱ्या पॅनमध्ये १ चमचा तेलात कढीपत्ता व हिरवी मिरची तडतडवून हे तळलेले मशरूम त्यात टॉस करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: अतिशय चवदार आणि चमचमीत भाजी ''कढाई मशरूम'' पराठ्यासोबत अप्रतिम लागते

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

दिवाळीच्या फराळाची खरी 'क्वीन' चकली; मग जिभेवर रंगणाऱ्या कुरकुरीत चकलीचे हे काही खास प्रकार

Happy Bhai Dooj 2026 Images भाऊबीज शुभेच्छा फोटो

Happy Dhanteras Wishes 2026 images धनतेरस शुभेच्छा इमेजेस

कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली बनवण्याची सोपी पद्धत; भाजणीपासून ते तळण्यापर्यंत संपूर्ण टिप्स

डोळ्यांचे आरोग्य आणि दृष्टी चांगली ठेवायची आहे? रोजच्या जीवनात अवलंबवा या सोप्या टिप्स!

पुढील लेख
Show comments