Marathi Biodata Maker
✕

लोखंडी कढईत अन्न शिजवा, लोहाची कमतरता दूर होईल

Updated: बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (16:21 IST)
 
आज आम्ही तुम्हाला लोखंडाच्या कढईत बनवलेले अन्न खाण्याचे फायदे सांगत आहोत. रोजच्या लोखंडी कढईत अन्न शिजवल्यास त्यापासून शरीराला पुरेसे लोह मिळते. लोखंडी कढईत अन्न शिजवण्याचे फायदे जाणून घ्या?
 
लोहाची कमतरता पूर्ण होते- लोखंडाच्या भांड्यात बनवलेले अन्न खाल्ल्याने शरीराला अनेक आजारांपासून वाचवता येते. शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी लोखंडाच्या भांड्यात अन्न शिजवावे. लोह कढई लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी खूप मदत करू शकते.
 
ही नॉन-स्टिक आहे- तुम्ही लोखंडी कढई नॉन-स्टिक म्हणूनही वापरू शकता. यामध्ये कोणतेही सिंथेटिक मटेरिअल वापरले जात नाही, त्यामुळे अन्नापर्यंत कोणतेही रसायन पोहोचत नाही. तुम्ही लोखंडी कढईत अगदी कमी तेलातही अन्न शिजवू शकता, यामुळे तुमचे वजन कमी होण्यासही मदत होईल.
 
लवकर गरम होतं- लोखंडी भांड्यांमध्ये तवा असो किंवा लोखंडी कढई, हे सर्व लवकर गरम होतात. लोखंडी तव्यावर पोळी बनवणे खूप फायदेशीर आहे. एकदा गरम केल्यावर लोखंड बराच काळ गरम राहते. नॉन-स्टिकच्या तुलनेत लोखंडी भांडी जास्त वेळ गरम राहतात.
 
जास्त काळ टिकते- नॉन-स्टिक भांडी नीट काळजी न घेतल्यास ते लवकर खराब होतात. तर लोखंडी भांडी दीर्घकाळ टिकतात. त्यांची साफसफाई करताना फार काळजी घेण्याचीही गरज नाही. लोखंडी कढई तुम्ही बराच काळ वापरू शकता.
 
स्वस्त असते- लोकांची भांडी इतर भांडीपेक्षा खूपच स्वस्त आहेत. तुम्ही ते अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. या प्रकारची भांडी स्वच्छ करणे देखील सोपे आहे. आपण ते मेटलच्या घासणीने स्वच्छ करू शकता.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

रेल्वेत स्टेशन मास्टरच्या १,२६५ पदांसाठी भरती; अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर

National Naturopathy Day 2026 औषधांशिवाय निरोगी राहण्याचा निसर्गाचा राजमार्ग; जाणून घ्या महत्त्व आणि फायदे

केसांना एरंडेल तेल लावण्याचे फायदे तोटे जाणून घ्या

Happy Amla Navami 2026 आवळा नवमी शुभेच्छा

न्यूरोएंडोक्राइन कर्करोग म्हणजे काय? त्याची लक्षणे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments