बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (22:17 IST)

चिंचेच्या पुलावची झटपट रेसिपी

जर आपल्याला दररोज भात खाऊन कंटाळा आला असेल तर आपण चिंचेचा भात करून पाहू शकता. रेस्टॉरंट स्टाईलमध्ये बनवलेला चिंचेचा भात खूप चवदार असतो. चिंचेचा भात बनवायला खूप सोपा आहे. चिंचेमध्ये कॅल्शियम, लोह, मॅंगनीज, फायबर, पोटॅशियम आणि फॉस्फरस यांसारख्या खनिजे देखील भरपूर प्रमाणात असतात. ब्लडप्रेशर नियंत्रित करण्यासाठी चिंच खूप गुणकारी आहे पण चिंचेचा भात दर रोज खाऊ नये. 
 
चिंचेच पुलाव बनवण्यासाठी साहित्य - 
2 वाट्या शिजलेला तांदूळ,
एक टेबलस्पून उडीद डाळ (साल न काढता)
अर्धी वाटी शेंग दाणे (भाजलेले)
4 टेबलस्पून चिंचेची पेस्ट,
2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या,
एक टीस्पून गूळ ,
अर्धा टीस्पून हळद पावडर
एक टीस्पून मोहरी 
चिमूटभर हिंग 
4-5 कढीपत्ता पाने 
2 सुक्या लाल मिरच्या
चवीनुसार मीठ
तेल
 
चिंचेचा भात बनवण्याची पद्धत- 
तांदूळ एका भांड्यात थंड करून घ्या. नंतर भातावर हळद आणि मीठ घालून   मिक्स करा. गॅसवर कढईत तेल गरम करा. उडीद डाळ आणि शेंगदाणे घालून मध्यम आचेवर तळून घ्या. डाळीचा रंग सोनेरी झाल्यावर त्यात कढीपत्ता, मोहरी, हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या घालून एक मिनिट परतून घ्या. आता कढईत हिंग, गूळ, चिंचेची पेस्ट आणि मीठ मिसळा. नंतर चिंचेचे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. गॅस बंद करा आणि शिजलेल्या भातामध्ये चिंचेचे मिश्रण टाका आणि चांगले मिसळा. स्वादिष्ट चिंचेचा भात तयार आहे. रायता किंवा चटणीसोबत खाऊ शकता.