Festival Posters

मुळ्याचा पाला टाकू नका, बनवा या स्वादिष्ट रेसिपी

Updated: गुरूवार, 26 डिसेंबर 2024 (15:29 IST)
एक बटाटा चिरलेला 
एक छोटा कांदा  चिरलेला 
एक हिरवी मिरची तुकडे केलेली  
अर्धा टीस्पून जिरे
अर्धा टीस्पून मोहरी
1/4 टीस्पून हळद  
चवीनुसार मीठ
एक टीस्पून तेल
 
कृती-
सर्वात आधी कढईत तेल गरम करून त्यात जिरे आणि मोहरी घाला. बिया तडतडायला लागल्यावर त्यात कांदा आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या. बटाटे आणि हळद घाला आणि काही मिनिटे शिजवा, नंतर मुळ्याची पाने आणि मीठ घालून चांगले मिसळा. झाकण ठेवून मंद आचेवर बटाटे आणि पाने मऊ होईपर्यंत शिजवा. तर चला तयार आहे आपली मुळ्याच्या पानांची भाजी, पोळी सोबत नक्कीच सर्व्ह करा. 
 
मुळ्याच्या पानांचे रायते 
साहित्य-
एक कप दही
अर्धा  कप मुळ्याची पाने  बारीक चिरलेली 
अर्धा टीस्पून जिरे पावडर
चवीनुसार मीठ
ताजी कोथिंबीर  
 
कृती-
सर्वात आधी दही चांगले फेटून घ्या. जिरेपूड आणि मीठ घाला. चिरलेली मुळ्याची पाने घालून मिक्स करा. कोथिंबीरीने गार्निश सजवा. तर चला तयार आहे आपले मुळ्याच्या पानांचे रायते, थंडगार सर्व्ह करा.
 
मुळ्याच्या पानांचे सूप
साहित्य-
एक कप मुळ्याची पाने चिरलेली 
अर्धा कांदा चिरलेला 
लसूण पाकळ्या बारीक तुकडे केलेल्या 
एक टीस्पून ऑलिव्ह ऑइल
दोन कप भाज्यांचा रस्सा
चवीनुसार मीठ  
मिरेपूड 
 
कृती-
सर्वात एका भांड्यात ऑलिव्ह ऑईल गरम करावे. त्यात कांदा आणि लसूण घाला आणि होईपर्यंत परतवून घ्या.  चिरलेली मुळ्याची पाने घालून दोन मिनिटे शिजवा.
भाज्यांचा रस्सा घाला, मीठ आणि मिरपूड घाला आणि 10 मिनिटे उकळू द्या. जर तुम्हाला सूपचे क्रीमी टेक्सचर आवडत असेल तर ते मिक्स करा. तर चला तयार आहे आपले मुळ्याच्या पानांचे सूप, गरम नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments