गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: गुरूवार, 19 डिसेंबर 2024 (16:53 IST)

मिक्स व्हेजिटेबल पराठा रेसिपी

paratha
साहित्य-
दोन कप पीठ 
दोन चमचे तेल
एक बटाटा
अर्धा कप किसलेले गाजर
अर्धा कप चिरलेली फुलकोबी
अर्धा कप मटार 
अर्धा कप बारीक चिरलेला कांदा  
दोन तुकडे केलेल्या हिरव्या मिरच्या 
एक इंच किसलेले आले 
दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर 
अर्धा टीस्पून धणेपूड 
1/2 टीस्पून धने पावडर
1/4 टीस्पून तिखट
1/4 टीस्पून गरम मसाला
1/4 टीस्पून आमसूल पावडर 
चवीनुसार मीठ
गरजेनुसार पाणी
 
कृती-
मिक्स व्हेज पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात पीठ घ्यावे. तसेच थोडे मीठ आणि तेल घालून मिक्स करावे. यानंतर पाणी घालून मऊ पीठ मळून घ्यावे. आता पीठ 15 मिनिटे झाकून ठेवा. नंतर कढईत तेल गरम करून त्यात कांदा व हिरवी मिरची घालावी. तसेच आले घालून सोनेरी होईपर्यंत परतवून घ्यावे. यानंतर त्यात  वरील भाज्या घालून 2 मिनिटे परतून घ्यावे. आता नंतर वरील कोरडे मसाले आणि मीठ घालून मिक्स करावे. उकडलेले आणि मॅश केलेला बटाटा आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे. यानंतर मळलेल्या पिठाचे छोटे-छोटे गोळे करून लाटून घ्या. नंतर तयार मिश्रण मधोमध भरून त्याची घडी करून पराठा लाटून घ्यावा. आता पराठा तव्यावर तेल लावून दोन्ही बाजूंनी शेकून घ्यावा. तर चला तयार आहे आपला मिक्स व्हेजिटेबल पराठा, दही सोबत नक्कीच सर्व्ह करा.     
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik