Festival Posters
✕

रात्रीची उरलेली खिचडी निरुपयोगी आहे असे समजू नका! काही मिनिटांतच नाश्त्यासाठी बनवा भन्नाट रेसीपी

Updated: गुरूवार, 11 जून 2026 (19:10 IST)
मसाले: १ चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, १ चमचा चाट मसाला, आणि चवीनुसार मीठ (खिचडीत आधीच मीठ असते, त्यामुळे बेताने टाका).
तेल: शॅलो फ्राय करण्यासाठी.
 
कृती-
१. मिश्रण तयार करा-एका मोठ्या बाऊलमध्ये उरलेली खिचडी घ्या. त्यामध्ये उकडलेला आणि मॅश केलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घाला.
 
२. मसाले आणि पीठ मिक्स करा-आता या मिश्रणात लाल तिखट, हळद, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाका. बाइंडिंग आणि कुरकुरीतपणासाठी ३ ते ४ चमचे तांदळाचे पीठ किंवा बेसन घाला. सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित एकत्र मळून घ्या (पाणी वापरण्याची गरज पडणार नाही).
 
३. कटलेटचा आकार द्या-हाताला थोडेसे तेल लावा. तयार मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे करून त्यांना गोल किंवा टिक्कीसारखा (कटलेट) आकार द्या.
 
४. शॅलो फ्राय करा-गॅसवर पॅन किंवा तवा गरम करायला ठेवा. त्यावर २ चमचे तेल टाका. तयार केलेले कटलेट्स तव्यावर ठेवा आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी छान गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी होईपर्यंत शॅलो फ्राय (भाजून) घ्या.
ALSO READ: Oats Cutlet Recipe पावसाळ्यात आरोग्यदायी ओट्स कटलेट्स बनवा, सोपी पद्धत
हे गरमागरम आणि कुरकुरीत खिचडी कटलेट्स टोमॅटो केचअप किंवा पुदिन्याच्या हिरव्या चटणीसोबत नाश्त्याला सर्व्ह करा. कोणाला कळणारही नाही की हे उरलेल्या खिचडीपासून बनवले आहेत!
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Delicious and healthy breakfast दलिया कटलेट; घरी बनवा कमी कॅलरी असलेला नाश्ता
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: घरीच झटपट बनवा अगदी हॉटेल स्टाईल बटाट्याचे कटलेट
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

ईश्वर काय करतो? कहाणी अकबर आणि बिरबलाची

मशरूम पासून झटपट ३ स्वादिष्ट स्नॅक्स! delicious snacks from mushrooms

सावधान! तुम्ही घेत असलेली प्रोटीन पावडर बनावट तर नाही ना? खरेदी करताना 'या' ७ गोष्टी नक्की तपासा!

दिवाळीत मुलांसाठी बनवा चॉकलेट नारळाचे लाडू; कमी साहित्यांत तयार होणारी रेसिपी

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे आयुर्वेद आणि विज्ञान दोन्ही सांगतात जाणून घ्या

पुढील लेख
Show comments