1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
  4. Make crispy breakfast from Semolina

रोज पोहे-उप्पीट खाऊन कंटाळलात? रव्यापासून बनवा 'हा' कुरकुरीत आणि पौष्टिक नाश्ता

तेच तेच पोहे आणि उपीट खाऊन कंटाळा आला असेल, तर रव्यापासून बनणारा हा कुरकुरीत आणि पौष्टिक 'रवा वडा' तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे. हा वडा वरून अगदी मेदूवड्यासारखा कुरकुरीत होतो आणि आतून तितकाच मऊ आणि चवदार लागतो. मुख्य म्हणजे यासाठी डाळ भिजवण्याची किंवा वाटण्याची अजिबात गरज नाही! हा नाश्ता कसा बनवायचा, याची सोपी रेसिपी आज आपण पाहणार आहोत.

साहित्य-
रवा (बारीक किंवा मोठा): १ कप
दही: ½ कप (किंचित आंबट असल्यास छान)
बारीक चिरलेला कांदा: १ मध्यम
हिरवी मिरची: २ ते ३ (बारीक चिरलेली)
आले: १ चमचा (किसलेले)
कढीपत्ता: ७-८ पाने (बारीक चिरून)
कोथिंबीर: बारीक चिरलेली
जिरे: १ छोटा चमचा
बेकिंग सोडा: १ चिमूटभर
मीठ: चवीनुसार
तेल: तळण्यासाठी

कृती-
१. मिश्रण तयार करणे: एका मोठ्या भांड्यात १ कप रवा, ½ कप दही आणि चवीनुसार मीठ एकत्र करून घ्या. आता यात थोडे थोडे पाणी घालून घट्ट गोळा तयार करा. हे मिश्रण १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा, जेणेकरून रवा छान फुलेल.

२. मसाले आणि भाज्या मिक्स करणे: १५ मिनिटांनंतर रव्याचे मिश्रण थोडे सुके वाटल्यास १-२ चमचे पाणी घाला. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आले, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे आणि चिमूटभर बेकिंग सोडा घाला. सर्व जिन्नस हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या.
 ALSO READ: अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी १० मिनिटांत बनवा कुरकुरीत सोयाबीनचा नाश्ता
३. वड्यांचा आकार देणे: हाताला थोडे पाणी किंवा तेल लावून घ्या. पिठाचा छोटा गोळा हातात घेऊन तो गोल करा आणि चपटा करून मधे मेदूवड्यासारखे छोटे छिद्र (होल) करा. पाणी लावल्यामुळे पीठ हाताला चिकटणार नाही.
४. कुरकुरीत तळणे: कढईत तेल चांगले गरम करून घ्या. गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि तयार केलेले वडे तेलात सोडा. वडे दोन्ही बाजूंनी छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. जर तुम्हाला हा नाश्ता जास्त तेलात तळायचा नसेल, तर याच पिठात भरपूर भाज्या (गाजर, शिमला मिरची) घालून तुम्ही त्याचे 'रवा अप्पे' किंवा तव्यावर कमी तेलात 'धिरडे' सुद्धा बनवू शकता. तर चला गरमागरम, कुरकुरीत आणि पौष्टिक रवा वडा तयार आहे! हा वडा तुम्ही ओल्या खोबऱ्याची चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करू शकता.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... आणखी वाचा
पुढील लेख
World Eye Donor Day 2026 : जागतिक नेत्रदान दिन, महत्त्व आणि इतिहास