Biodata Maker marathi
✕

Ragi Vegetable Momos मैदा-मुक्त, पौष्टिक असे ''नाचणी व्हेजिटेबल मोमोज''

Updated: शनिवार, 10 ऑक्टोबर 2026 (13:55 IST)
साहित्य-
मोमोजच्या पारीसाठी:
नाचणीचे पीठ (Ragi Flour): १ कप
गव्हाचे पीठ: २ ते ३ चमचे (बाइंडिंगसाठी)
गरम पाणी: पीठ मळण्यासाठी
मीठ: चवीनुसार
तेल: १ चमचा

सारणासाठी :
बारीक चिरलेला कोबी: १ कप
किसलेले गाजर: १/२ कप
बारीक चिरलेली शिमला मिरची: १/२ कप
बारीक चिरलेला कांदा: १/२ कप (ऐच्छिक)
आले-लसूण (बारीक चिरलेले): १-१ चमचा
सोया सॉस: १ चमचा (ऐच्छिक)
काळी मिरी पूड: १/२ चमचा
सॉस किंवा तेल: १ चमचा
मीठ: चवीनुसार

कृती-
१. मोमोजचे पीठ मळणे:एका भांड्यात नाचणीचे पीठ, गव्हाचे पीठ आणि थोडे मीठ एकत्र करा. त्यात उकळते गरम पाणी थोडे-थोडे घालून चमच्याने मिक्स करा. (गरम पाण्यामुळे नाचणीचे पीठ मऊ होते आणि मोमोज तुटत नाहीत.) थोडे थंड झाल्यावर १ चमचा तेल लावून मऊ आणि मऊसर पीठ मळून घ्या. १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा.

२. भाजीचे सारण बनवणे: कढईत १ चमचा तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेले आले आणि लसूण घालून काही सेकंद परता. त्यात कांदा, कोबी, गाजर आणि शिमला मिरची घालून मध्यम/मोठ्या आचेवर २ ते ३ मिनिटे परतून घ्या. (भाजी पूर्ण शिजवायची नाही, क्रंची ठेवायची आहे.) आता त्यात काळी मिरी पूड, सोया सॉस आणि चवीनुसार मीठ घाला. चांगले मिक्स करून गॅस बंद करा आणि सारण थंड होऊ द्या.
ALSO READ: बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ, अतिशय चविष्ट तंदूरी मोमोज रेसिपी
३. मोमोज बनवणे व वाफवणे: मळलेल्या पीठाचे लहान-लहान गोळे तयार करा. थोडे कोरडे पीठ लावून लहान आणि पातळ पुरी लाटून घ्या (नाचणीचे पीठ असल्याने कडा थोड्या फाटू शकतात, हाताने आकार नीट करा) पुरीच्या मध्यभागी १ ते दीड चमचा तयार सारण ठेवा कडा एकत्र आणून मोदकाप्रमाणे किंवा मोमोजच्या पारंपरिक आकारात घड्या घालून बंद करा. स्टीमर किंवा इडली पात्राला थोडे तेल लावून मोमोज ठेवा आणि १० ते १२ मिनिटे वाफेवर शिजवून घ्या. गरमागरम नाचणीचे मोमोज तिखट शेझवान सॉस किंवा लाल तिखट-टोमॅटोच्या मोमोज चटणीसोबत सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Veg Momos घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल 'व्हेज मोमोज'

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

Bhai Dooj 2026 भावाला खूश करण्यासाठी बनवा खास थाळी, जाणून घ्या सोप्या पाककृती

Happy Diwali Padwa to Husband in Marathi Images नवर्‍याला दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

दिवाळीत दिसायचे आहे सर्वांत सुंदर? ग्लोइंग लुकसाठी मेकअपच्या ‘या’ खास टिप्स फॉलो करा

Annakut गोवर्धन पूजेसाठी घरी 'अन्नकूट' कसे तयार करावे? परंपरा आणि महत्त्व जाणून घ्या

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments