suvichar

Tomato Pakora फक्त १० मिनिटांत बनवा कुरकुरीत टोमॅटोची जाळीदार भजी; पाहा सोपी रेसिपी

Updated: शनिवार, 25 एप्रिल 2026 (15:25 IST)
ओवा: अर्धा चमचा (हातावर चोळून)
आलं-लसूण पेस्ट: १ चमचा
बारीक चिरलेली कोथिंबीर: आवडीनुसार
बेकिंग सोडा: चिमूटभर (हवे असल्यास)
मीठ: चवीनुसार
तेल: तळण्यासाठी
 
कृती:
प्रथम टोमॅटो स्वच्छ धुवून कोरडे करून घ्या. त्याचे जास्त पातळ किंवा जास्त जाड नसलेले गोल काप करून घ्या. त्यातील बिया आणि पाणी हलके काढून टाकले तरी चालेल जेणेकरून भजी साळसर होणार नाहीत.
एका बाऊलमध्ये बेसन आणि तांदळाचे पीठ एकत्र करा. त्यात लाल तिखट, हळद, ओवा, मीठ, आलं-लसूण पेस्ट आणि कोथिंबीर टाका. थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवा. टीप: पीठ मध्यम हवे (भजीच्या पिठासारखे), जास्त पातळ करू नका नाहीतर टोमॅटोला चिटकणार नाही.
काही ठिकाणी जाळीदार भजी करण्यासाठी पीठ थोडे सैल ठेवून हाताच्या बोटांनी गरम तेलात सोडून जाळी तयार केली जाते आणि त्यावर टोमॅटोचा काप ठेवला जातो. पण घरगुती पद्धतीत, टोमॅटोच्या स्लाईसला पिठात घोळवून तेलात सोडा आणि वरून चमच्याने थोडे पीठ विखरून सोडा, ज्यामुळे त्याला जाळीदार आकार येईल.
कढईत तेल चांगले गरम करा. टोमॅटोचा एक एक काप पिठात बुडवून गरम तेलात सोडा. गॅसची फ्लेम मध्यम ठेवा जेणेकरून भजी आतून व्यवस्थित शिजतील आणि बाहेरून लालसर व कुरकुरीत होतील.
भजी दोन्ही बाजूंनी छान तळून झाली की टिश्यू पेपरवर काढून घ्या.
 
खास टिप्स:
टोमॅटो कापल्यानंतर त्यावर थोडे मीठ आणि चाट मसाला भुरभुरा, यामुळे भजी खाताना आतून अळणी लागणार नाहीत.
जाळी अधिक छान येण्यासाठी पिठात गरम तेलाचे 'मोहन' (१ चमचा गरम तेल) टाका.
ही गरमागरम टोमॅटो भजी पुदिना चटणी किंवा टोमॅटो केचपसोबत अप्रतिम लागतात!
 
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

हरतालिका व्रत उपवासात मीठ खात नाही मग बनवा या रेसिपीस दिवसभर ऊर्जा राहील

Happy Ganesh Chaturthi Wishes Images 2026 गणेश चतुर्थी शुभेच्छा फोटो

गणेशोत्सवात प्रसादासाठी किंवा उपवासासाठी उत्तम पर्याय ''मावा मखाना खीर''

Happy Hartalika Tritiya Images Marathi हरतालिका तृतीया शुभेच्छा इमेजेस

वजन मोजण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या वजन मोजण्याची योग्य वेळ आणि महत्त्वाच्या टिप्स

पुढील लेख
Show comments