मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. महिला दिन
Written By वेबदुनिया|

उपेक्षित नारी

सौ. स्वाती दांडेकर

ND
मी एक उपेक्षित नारी समाजाची
आपल्या पोटाची भूख भागविण्या साठी
करते शांत भूख रोज दुसर्‍याची ।।1।

असले मी किती उपेक्षित जरी
तुमच्या ह्या शुभ्र समाजासाठी
काळे डाग त्याचे मीच लपविले
पोर्णिमेच्या रात्रीत ही ।।2।।

घाव माझ्या अंतरीच
कसे दाखवु तुम्हा ते
व्यथा माझ्या जीवनाची
बनते कहाणी तुमच्या मासिकाची
सोडुनी एक उसासा माझ्या साठी
बिचारी म्हणुन संपते गोष्ट माझ्या जीवनाची ।।3।

नचरेचे बाण सोसते अंगावरी
स्पर्शाने सरसरते काया माझी
शाब्दीक मार सहन करते हृदयावरी
मृत मन, बधीर तन,
घेऊन रोज मरते, रोज जगते
द्रोपदी मी कलियुगाची,
निज, आस असते एक कृष्णाची ।।4।।

वंशवेल वाढवते अज्ञान पित्याच
कोणते नांव देऊ मुलांस मी
आंधळी कोशिंबीर खेळतात हे जीवनाशी
वारसा देते त्यांना एक
निराश्रीत जीवनाचा
इच्छा असे मानसी बनु सावली वट वृक्षाची ।।5।

कहाणी नाही ही माझ्या एकटीची
असे अनेक माझ्या भगिनीची
मागणे एक ह्या सुसंकृत समाजाशी
घ्या पुढार आमच्या साठी
मायेच्या कुशीत घ्या माझ्या लेकरांना
शुभ्र आरसा त्यांना बनु द्या
प्रतिंबिंब असो त्यांच्याच सारखे
हेच सांगुन माझी कहाणी संपवते