मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. महिला दिन
Written By वेबदुनिया|

माझे अश्रू मीच पुसते

सौ. स्वाती दांडेकर

ND
माझे अश्रु मीच पुसते
येता गंगा यमुना
डोळ्यात माझ्या त्यांना
मीच परतवते
माझे अश्रु मीच पुसते ।।1।।

होता छळ भावनांचा
काळीज माझे घायाळ होते
त्यावर प्रेमाचा लेप मीच लावते
माझे अश्रु मीच पुसते ।।2।।

होता अपमान माझा
स्वाभिमानाची ठेच सोसते
संयमाचे पांघरूण त्यावर मीच घालते
माझे अश्रु मीच पुसते ।।3।

होता दु:ख मनी
निराशा माझ्या मनी येते
पुन्हा आशेचा दीप मीच लावते
माझे अश्रु मीच पुसते ।।4।।

करते अपेक्षा पूर्ति सर्वांची
उपेक्षा माझ्या पदरात येते
कर्तव्याचे पांघरूण मनी घालते
संयमाचे कवच धारण करते
माझे अश्रु मीच पुसते ।।5।।