Last Modified: मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (16:19 IST)
'कमीने'ची टीम बचावली...
शहीद व प्रियंका चौप्रा शूटींगसाठी येणार होते
मायानगरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात रूपेरी दुनियेतील कलाकार आपाआपल्या कामात शहराच्या विविध ठिकाणी शूटींगच्या कामात व्यस्त होते. तसेच दिग्दर्शक विशाल भारतद्वाज त्याचा चित्रपट 'कमीने'च्या शूटींगची तयारी करत होते. दहशतवादी हल्ल्यात कमीनेची टीम बालंबाल बचावल्याचे वृत्त आहे.
शूटींगच्या केलेल्या नियोजनानुसार बुधवारी मुंबईतील हार्निमन सर्किलवर ठिक रात्री साडे दहाला शूटींग करण्यात येणार होती. मात्र, अचानक शूटींगच्या आधी दहशतवाद्यांनी तेथे हल्ला चढविला. शूटींगसाठी शहीद कपूर आणि प्रियंका चोप्रा येणार होते. शूटींगसुरू होण्यापूर्वीच पोलीस ठिकाणावर पोहचले आणि पॅकअप करायला सांगून तेथून सगळ्यांना घरी जाण्यास सांगितले.