दोन दिवसांपासून दहशतवादाच्या सावटाखाली वावरणाऱ्या मुंबईकरांनी आज काहीसा सुटकेचा नि:श्वास टाकला. आज सायंकाळी नरीमन हाउसमध्ये दोन दहशतवाद्यांना एनएसजी आणि नौदलाच्या जवानांनी कंठस्थान घातल्यानंतर नरीमन हाउसवर कब्जा केला. दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त स्थानिक नागरिकांना मिळताच या भागातील नागरिकांनी रस्त्यावर उतरत आपला आनंद व्यक्त केला. नागरिकांनी या भागातून जाणाऱ्या लष्कराच्या गाड्या आणि त्यातील जवानांने अभिनंदन करत त्यांचे कौतुक केले. तर काही जणांनी या भागात भारत माता की जय अशी जोरदार घोषणा बाजी करत टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात या जवानांचे स्वागत केले.