सोमवार, 16 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 (11:45 IST)

मुंबईमध्ये 17 वर्षीय तरुणीची आत्महत्या

suicide
महाराष्ट्रातील मुंबईत माहीममध्ये 17 वर्षीय एका तरुणीने आत्महत्या केली आहे. या प्रकरणाची चौकशी करीत असलेल्या अधिकरींनी सांगितले की, तिने कापड बाजारातील बुरहानी हवेली मध्ये फाशी लावून घेतली आहे. ती मागील दोन वर्षांपासून नैराश्य मधून जात होती व त्यावर उपचार घेत होती. तेव्हा पासून ती घरातच राहत होती. डिप्रेशनमुळे तिला पॅनिक अटॅक येत होते.  
 
मिळालेल्या माहितीनुसार ती तिच्या बहिणीला म्हणाली की, माझी प्रकृती ठीक नाही आहे. तसेच तिच्या बहिणीचे घर तिच्या घरापासून जवळ आहे व मृत तरुणीची आई कामासाठी बाहेर गेली होती. त्यावेळेला तिने हे पाऊल उचलले असे पोलीस अधिकारींनी सांगितले आहे. तसेच माहिमपोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Edited By- Dhanashri Naik