बुधवार, 15 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 13 ऑक्टोबर 2024 (16:19 IST)

मुंबईत रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले मोठा रेल्वे अपघात टळला!

मुंबईतून मोठी बातमी. वेस्टर्न लाईनवर रविवारी दुपारी एक लोकल रुळावरुन घसरली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार,आज दुपारी 12:10 च्या सुमारास मुंबई सेंट्रल कारशेडमध्ये प्रवेश करताना लोकल ट्रेन (EMU) रुळावरून घसरली. त्यात प्रवासी नसले तरी मोठी दुर्घटना टळली.
 
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, रिकाम्या रेकचे दोन डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातानंतर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल धीम्या मार्गावरील गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, गाड्या सुरूच आहेत.

चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान लोकल जलद मार्गावर वळवण्यात येत आहेत. रेक रिकामा असल्याने कोणीही जखमी झाले नाही.रविवारी (13 ऑक्टोबर) दसरा सण असल्याने पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात कोणताही ब्लॉक नाही.
Edited By - Priya Dixit