रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 26 सप्टेंबर 2024 (09:46 IST)

मुंबईत मुसळधार पावसामुळे महिलेचा नाल्यात बुडून मृत्यू

Lady Death
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच राजधानी मुंबईमध्ये देखील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यादरम्यान मुंबईतील अंधेरी येथे बुधवारी मुसळधार पावसामुळे ओव्हरफ्लो झालेल्या एका नाल्यात एका 45वर्षीय महिलेचा बुडून मृत्यू झाला आहे.   
 
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रात्री 9.20 च्या सुमारास घडली. तसेच विमल अनिल गायकवाड असे पीडितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला तातडीने कूपर रुग्णालयात नेण्यात आले पण चिकिस्तकांनी तिला मृत घोषित केले. 

Edited By- Dhanashri Naik