रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 30 ऑक्टोबर 2024 (16:21 IST)

मुंबईत जेवण्यापूर्वी बळजबरी जय श्रीराम घोषणा लावण्याचा आरोप

social media
मुंबईतून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये  एका मुस्लिम महिलेला एक व्यक्ती जेवण घेण्यापूर्वी जय श्रीरामची घोषणा लावण्याचे म्हणत आहे. हा व्यक्ती महिलेला बळजबरी जय श्रीरामाची घोषणा केल्यावरच जेवण घ्यायचे असे म्हणत आहे. 
 
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या वर जोरदार चर्चा सुरु आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भोईवाडा पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. 
   
प्रकरण काय आहे? 
सदर प्रकरण मुंबईतील टाटा रुग्णालयाच्या बाहेरचा असून व्हिडीओ मध्ये एक व्क्ती सर्वांना जेवण वाटप करत आहे. व्यक्तीवर आरोप करण्यात आला आहे की हा जेवण घेण्यापूर्वी सर्वांना जय श्रीरामची घोषणा करायला म्हणत आहे. 
 
व्हिडीओ मध्ये हिजाब घालून आलेली महिलेला देखील घोषणा करायला बाध्य केले आणि तिने असे केले नाही म्हणून तिला जेवण दिले नाही आणि हाकलून दिले. 
 
आरोपात किती सत्यता आहे-
स्थानिक लोकांनी हे प्रकरण घडत असताना त्याचा व्हिडीओ बनवला आणि व्हायरल केला. या प्रकरणावर नेटकरी आपापल्या प्रतिक्रिया  देत असून काहींनी हे योग्य आहे असे म्हटले आहे तर काहींनी याचा विरोध केला आहे. अन्न वाटपाच्या नावाखाली अशा घोषणा देणे चुकीचे असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.हा जातीभेद असून आपले धर्म एखाद्यावर लादणे चुकीचे आहे. 
 
पोलिसांनी तपास सुरु केला.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर महिलेच्या आक्षेपावर, व्हिडिओ बनवणारी व्यक्ती तिला सांगत आहे की,जर आपण घोषणा देऊ शकत नाही तर आपण जेवण देखील घेऊ नका .
 
व्हिडिओमध्ये घोषणा लावणारा व्यक्ती स्वतः मान्य करत आहे की जेवणापूर्वी घोषणा करणे काही चुकीचे नाही. भोईवाडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. 
 
अली कडेच गाझियाबाद्च्या क्रॉसिंग रिपब्लिक पोलीस ठाणे परिसरात असलेल्या पंचशील वेलिंग्टन सोसायटीमध्ये उर्दू शिकवण्यासाठी जाणाऱ्या कारीसोबत जय श्री राम न बोलल्याने गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे.
 
 याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तक्रारदार आलमगीर यांनी आरोप केला आहे की, तो पंचशील वेलिंग्टन सोसायटीच्या 16व्या मजल्यावर उर्दू शिकवण्यासाठी जातो.
 
अशा स्थितीत तो लिफ्टमध्ये 16 व्या मजल्यावर जात असताना एका व्यक्तीने आलमगीरला सोसायटीत येण्याचे कारण विचारले आणि बळजबरी जय श्री राम घोषणा देण्यास सांगितले. 
कारीने जय श्री राम न म्हणताच त्याला लिफ्टच्या बाहेर हाकलून दिले 
Edited By - Priya Dixit