1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
  4. Big revelation in the death of four members

मुंबई : कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणी मोठा खुलासा

मुंबईच्या पायधुनी परिसरातीलअब्दुल्ला डोकाडिया, पत्नी नसरीन, मुली आयशा आणि झैनब  कुटुंबच्या चौघांच्या मृत्यू प्रकरणात अद्याप पूर्ण खुलासा झालेला नाही. कुटुंबीयांनी नातेवाईकांसोबत बिर्याणी खाल्ली. नंतर या चार जणांनी टरबूज खाल्ले . पहाटे सर्वांना उलट्या, जुलाब, अशक्तपणा सुरू झाला. न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवली. त्यांना प्रथम स्थानिक रुग्णालयात, नंतर जे.जे. रुग्णालयात दाखल केले.नंतर एका दिवसात चौघांचा मृत्यू झाला. 
सुरुवातीला अन्नातून विषबाधा झाली, विशेषतः कलिंगडमुळे असा अंदाज होता. पण  पोस्टमॉर्टेममध्ये किडनी फेल्युअरचे संकेत मिळाले. काही रिपोर्ट्सनुसार शरीरात पेनकिलर (वेदनानाशक) सारखा संशयास्पद पदार्थ आढळला आहे, ज्यामुळे गूढ वाढले आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, सामान्य अन्न विषबाधेमुळे इतक्या वेगाने काही तासांत चौघांचा मृत्यू होणे दुर्मीळ आहे. त्यामुळे घातपातच्या अँगलनेही तपास सुरू आहे. FDA ने घरातून ११ नमुने (बिर्याणी, कलिंगड, भात, चिकन, पाणी इ.) जप्त केले आहे. कीटकनाशके  किंवा इतर विषारी पदार्थ असल्याची शक्यता तपासली जात आहे. कलिंगड विक्रेत्याचीही चौकशी झाली; इतरत्र कलिंगड खाल्ल्याने अशा घटना घडल्या नाहीत.
डॉक्टर आणि तज्ज्ञ सांगतात की कलिंगड स्वतःहून विषारी नसते, रात्री खाल्ल्याने मृत्यू होत नाही. बिर्याणी-कलिंगड एकत्र खाल्ल्यानेही सामान्यतः असे होत नाही. आता हे प्रकरण अन्न सुरक्षा, कलिंगडातील दूषितता आणि संभाव्य घातपात यांच्याभोवती फिरत आहे. 

Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
LIVE: अमृत ​​भारत एक्सप्रेस ५ मे पासून मुंबई आणि अयोध्या दरम्यान नियमित सेवेसह धावणार