बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश, 15वा आरोपीला पंजाबमधून अटक
मुंबई पोलीस आणि पंजाब पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील 15 व्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून याआधी 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या महतीनुसार आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पंजाब पोलीस आणि मुंबई पोलिसांनी लुधियाना येथून एका आरोपीला अटक केली असून सुजित कुमार असे आरोपीचे नाव आहे. पंजाब पोलीस आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत आरोपी सुजित कुमारला अटक करण्यात आली आहे.
आरोपी सुजित कुमारला पोलिसांनी भामिया कलान परिसरातून अटक केली आहे. बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर आरोपी सुजित त्याच्या सासरी लपून बसला होता. याप्रकरणी आतापर्यंत एकूण 15 जणांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी या हत्येप्रकरणी 14 जणांना अटक करण्यात आली होती.
Edited By- Dhanashri Naik