मंगळवार, 21 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शुक्रवार, 20 डिसेंबर 2024 (15:10 IST)

भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला,पोलिसांनी लाठीचार्ज केला

Mumabai News: भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केला आणि कार्यालयाची नासधूस केली. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. या विरोधात भाजपच्या युवा मोर्च्याच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी कार्यकर्त्याना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. 

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील आझाद मैदानात असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयात घुसुन तोडफोड करत नासधूस केली.युवा कार्यकर्त्यांची काँग्रेसच्या कार्यालयात शिरताना बाचाबाची झाली नंतर पोलिसांनी कार्यकर्त्याना पांगविण्यासाठी बळाचा वापर करत लाठीचार्ज केला. 
Edited By - Priya Dixit