पावसामुळे मुंबई पाण्याखाली गेली; दौऱ्यावर आलेल्या महापौरांसोबत बीएमसीचा कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला
मुंबईतील एक मॅनहोल मृत्यूचा सापळा बनून त्यात बीएमसीचा एक अधिकारी पडल्यानंतर अमोल मटेले यांनी कंत्राटदारांवर जोरदार टीका केली आहे.
मुंबईतील पहिल्या मुसळधार पावसामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे दावे आणि मान्सूनपूर्व तयारी उघडी पडली आहे. पाणी साचण्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि पायाभूत कामांची पाहणी करण्यासाठी गेलेला बीएमसीचा एक अधिकारी घसरून उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याने हे प्रकरण अधिकच तापले आहे. ही घटना मुंबईच्या महापौरांच्या उपस्थितीत घडली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) राज्य प्रवक्ते आणि मुंबई युवा अध्यक्ष ॲड. अमोल मटेले यांनी या गंभीर निष्काळजीपणाबद्दल पालिकेचे कंत्राटदार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. मटेले यांनी आरोप केला आहे की, मुंबईचे रस्ते आणि उघडे मॅनहोल आता सामान्य नागरिक आणि सुरक्षा अधिकाऱ्यांसाठीही 'मृत्यूचे सापळे' बनत आहे. कंत्राटदारांचे परवाने रद्द करण्याची आणि त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी या घटनेला कंत्राटदारांचा फौजदारी निष्काळजीपणा संबोधत, अमोल मटेले यांनी सरकार आणि बीएमसी आयुक्तांकडून तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली.
Edited By- Dhanashri Naik
