गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (14:22 IST)

बादलीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

भिवंडी येथील देव नगर परिसरात एक वर्षाच्या चिमुकल्याचा पाण्याच्या बादलीत पडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. टीव्ही पाहण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य हॉलमध्ये बसले होते. त्यावेळी दिलकैश खेळता खेळता बाथरूममध्ये गेला. दिलकैश बाथरूम मधील पाण्याने भरलेल्या एका बादलीत जाऊन पडला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेच्या वेळी मृत दिलकैशची आई किचनमध्ये जेवण बनवत होती.