संबंधित माहिती
- अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला छत्तीसगडमधून अटक
- काँग्रेसवर निशाणा साधत रामदास आठवलेंनी जातीवादी राजकारणाचा गंभीर आरोप केला
- ओवेसींच्या वक्तव्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिउत्तर
- फडणवीस मुस्लिम समाजाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे-ओवेसी
- यवतमाळमध्ये बॅगची झडती घेतली म्हणून उद्धव ठाकरे संतापले
आदर्श आचारसहिंता लागू असतांना नवी मुंबईत कोट्यवधींची रोकड जप्त
Mumbai News : 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. तसेच महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागू झाली आहे. यावेळी पोलीस ठिकठिकाणी नाकाबंदी करत आहे, पण तरीही दररोज लाखो कोटींची रोकड जप्त केली जात आहे. सोमवारी ठाणे पोलिसांनी नवी मुंबईतून कोट्यवधींची रोकड जप्त केली अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे. पोलीस ठिकठिकाणी नाकाबंदी करत आहे, पण तरीही दररोज लाखो कोटींची रोकड जप्त केली जात आहे.
सोमवारी ठाणे पोलिसांनी नवी मुंबईतून कोट्यवधींची रोकड जप्त केली. ठाणे पोलिसांनी नवी मुंबईतील नेरूळमधील सेक्टर 16 येथील एका रो-हाऊसमधून सुमारे अडीच कोटी रुपयांची रोकड जप्त केली, अशी माहिती अधिकारींनी सोमवारी दिली.
Edited By- Dhanashri Naik
