बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 22 जानेवारी 2025 (09:52 IST)

हेल्मेट आणि लायसन्सशिवाय दुचाकी चालवणाऱ्या तरुणाला न्यायालयाने दिली अनोखी शिक्षा

court
Mumbai News: हेल्मेट आणि लायसन्सशिवाय दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन तरुणाची ही घटना 2017  वर्षातील आहे. त्यानंतरच या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आला. या प्रकरणात न्यायालयाने आता तरुणाला एक अनोखी शिक्षा सुनावली आहे.   
मिळालेल्या माहितीनुसार 2017 मध्ये अल्पवयीन असताना हेल्मेट आणि परवाना नसताना दुचाकी चालवताना पकडलेल्या एका तरुणविरुद्धचा खटला मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे, परंतु त्याला चार रविवारी येथील रुग्णालयात सामुदायिक सेवा करण्याचे आदेश दिले आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार, हेल्मेट आणि लायसन्सशिवाय दुचाकी चालवणाऱ्या तरुणाला आता रुग्णालयात रुग्णांची सेवा करावी लागेल. यासोबतच, न्यायमूर्ती आणि उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 16 जानेवारी रोजी दिलेल्या आदेशात त्या व्यक्तीला त्याचा ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी शहर पोलिसांकडे जमा करण्याचे निर्देश दिले. तसेच व्यक्तीविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करताना, उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने तो नुकताच शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात होता याची दखल घेतली. मोटारसायकल चालवताना तो नेहमी हेल्मेट घालेल असे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाने त्या व्यक्तीला दिले.

Edited By- Dhanashri Naik