शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 10 जून 2021 (17:47 IST)

मुंबईत दीड कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

एनसीबीनं (NCB Mumbai) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. अमेरिकेतून भारतात आणलेले तब्बल दीड कोटी रुपयांचं ड्रग्ज एनसीबीनं जप्त केलेत. तसंच ड्रग्जच्या पार्सलवर इमर्जन्सी फूड असा उल्लेख करण्यात आला होता, अशी माहिती समोर येतेय. गेल्या अनेक दिवसांपासून एनसीबी मुंबईतील ड्रग्ज सप्लायर्स (Drug Suppliers)आणि पेडलर्सविरुद्ध (Peddlers)कारवाई करताना दिसत आहे. एनसीबीनं अनेक ठिकाणी छापेमारी करुनही बऱ्याचदा ड्रग्ज जप्त केलेत.
 
आज एनसीबीनं मुंबईतून 2.2 किलोचे ड्रग्ज जप्त केलेत. या एकूण ड्रग्जची किंमत जवळपास दीड कोटींच्या आसपास आहे. मुंबईत एनसीबीनं छापा टाकत ही कारवाई केली आहे. निळ्या रंगाच्या बॉक्सवर “Mountain House 05 day emergency food supply.(इमर्जन्सी फूड)'' असं लिहण्यात आलं होतं. सिल्व्हर रंगाच्या फूड पॅकेट्समध्ये हे ड्रग्ज लपवण्यात आले होते.