Dharma Sangrah
✕

परवानगी शिवाय ड्रोन उडवल्याबद्दल मुंबईत एफआयआर दाखल

Updated: सोमवार, 12 मे 2025 (15:51 IST)
ALSO READ: मुंबईत ऑपरेशन सिंदूरवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल 20 वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
पवई परिसरातील साकी विहार रोडवर लोकांनी आकाशात एक ड्रोन पाहिला, ज्यामुळे तेथील लोक घाबरले. लोकांनी तात्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून याची माहिती दिली आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. तपासात असे दिसून आले की हा ड्रोन एका 23 वर्षीय तरुणाचा होता आणि त्याच्याकडे त्याचा परवानाही नव्हता.  
भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, देशातील अनेक भागात आकाशात ड्रोन उडवण्यास बंदी आहे.
ALSO READ: लाडकी बहीण योजनेच्या नावाने बँक खाती उघडून सायबर गुंडांना विकली, ३ जणांना अटक
पोलिसांनी ड्रोनच्या मालकाची चौकशी केली तेव्हा असे आढळून आले की मूळचा हैदराबादचा रहिवासी असलेला 23 वर्षीय तरुणाने हा ड्रोन एक वर्षापूर्वी खरेदी केला होता.  
तरुणाने पोलिसांना सांगितले की, ड्रोन तुटला असून तो त्याची दुरुस्ती करत होता. चाचणीसाठी त्याने ड्रोन उडवला होता.तो चुकून जास्त उंचीवर गेला. आजूबाजूच्या लोकांना संशयास्पद ड्रोन बघितल्यावर ताबडतोब पोलिसांना कळविले. नंतर हे प्रकरण उघडकीस आले. 
ALSO READ: ऑपरेशन सिंदूर'वर टीका करणाऱ्या 40 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल
चौकशीनंतर पवई पोलिसांनी तरुणा विरुद्ध परवानगीशिवाय ड्रोन उडवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. 4 एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी ड्रोन, मायक्रोलाईट विमाने, गरम हवेचे फुगे आणि पॅराग्लायडिंग यासारख्या गोष्टींवर महिनाभर बंदी घातली होती.तरुणाकडे ड्रोनचा परवाना नव्हता.
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे मिळणार

अजित पवार यांचा मृत्यू हा अपघात होता की कट? तपास जलदगतीने करण्यासाठी फडणवीस यांनी अमित शाह यांच्याकडे मदत मागितली

जय शाह यांची आयसीसी अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड

ब्रिटनचे प्रिन्स विल्यम पत्नीसोबत भारत दौऱ्यावर; मुंबईत महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची भेट घेतली

महाराष्ट्र सरकारचा मोठा उपक्रम; महिला कैद्यांसाठी खुल्या तुरुंग वसाहती, जिथे पात्र कैदी त्यांच्या कुटुंबासोबत राहू शकतील

पुढील लेख
Show comments