शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (08:47 IST)

Mumbai: गोरेगावमध्ये 7 मजली इमारतीला भीषण आग, 46 जण दगावले, 6 जणांचा मृत्यू

fire
Fire in Mumbai's Goregaon: मुंबईच्या गोरेगावमध्ये आग : मुंबईतील गोरेगाव येथील आझाद नगरमधील समर्थ नावाच्या ७ मजली इमारतीला काल रात्री भीषण आग लागली. पहाटे 2.30 ते 3 च्या दरम्यान इमारतीच्या पार्किंगला लागलेल्या आगीत 6 जणांचा मृत्यू झाला असून 46 जण जखमी झाले आहेत. दोन जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
पार्किंग क्षेत्रात आग
येथे इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 4 कार आणि 30 हून अधिक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या, अग्निशमन दलाच्या 10 हून अधिक गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवता आले.
 
सध्या कूलिंगचे काम सुरू आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, इमारतीच्या पार्किंगमध्ये बरेच जुने कापड ठेवलेले होते, त्याला आग लागली असावी आणि काही वेळातच त्याने संपूर्ण पार्किंग आणि इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याला वेढले.