मुंबईमध्ये नशायुक्त औषध देऊन तरुणीसोबत सामूहिक लैंगिक अत्याचार
महाराष्ट्रातील मुंबई मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिथे एका मुलीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवण्यात आले व तिला नशायुक्त औषध देण्यात आले व तिच्यासोबत सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी या 18 वर्षीय तरूणीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवले व नंतर पाण्यामधून तिला नशेचे औषध देण्यात आले यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला या तरुणीने सांगितले की तिला अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर दोन जणांनी लैंगिक अत्याचार केला.
तसेच या पीडितेने सांगितले तिला धमकी देखील देण्यात आली की, जर कोणाला सांगितले तर तिला जीवे मारण्यात येईल. या नंतर पीडितेने बांद्रा निर्मलनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे व एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरु आहे.